कल्याण येथून साई भक्तांचे साईबाबांच्या दर्शनासाठी पाथरी येथे आगमन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक12 डिसेंबर 2025 रोजी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कल्याण पश्चिम येथील 150 साई भक्तांचे साईबाबांच्या दर्शनासाठी साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे आगमन झाले. मंदिर अधीक्षिका सौ छाया कुलकर्णी यांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले. साई मंदिरात भक्ती पूर्ण वातावरणात आनंदाने सत्संगाचा कार्यक्रम झाला. व्यवस्थापन मंडळाच्या वतीने ॲड. मुकुंदराव दिनकरराव चौधरी कार्यकारी अधिकारी यांनी साई मंदिरात प्रकाशजी जगताप वगैरे साई भक्तांचा यथोचित आदर सत्कार केला. सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कल्याण यांच्यावतीने प्रकाशजी जगताप वगैरे साई भक्तांनी ॲड. अतुल दिनकरराव चौधरी व्यवस्थापकीय विश्वस्त, मुकुंद दिनकरराव चौधरी कार्यकारी अधिकारी, सौ छाया कुलकर्णी मंदिर अधीक्षिका तसेच सेवेकाऱ्यांचा सत्कार केला.

सौ छाया कुलकर्णी मंदिर अधीक्षिका यांनी भाविकांना पाथरी तीर्थक्षेत्राची, तसेच साईबाबा जन्मस्थानाची ऐतिहासिक धार्मिक माहिती दिली . बालाजी बेदरे, प्रसादालय विभाग शिवकन्या नागठाणे यांनी भक्तांच्या चहा पानाची व प्रसाद भोजनाची व्यवस्था केली. प्रभाकर पाटील भक्तनिवास यांनी भाविकांच्या निवासाची व्यवस्था केली. सौ कलाबाई कांबळे, श्रीमती कमलबाई तेलंगे यांनी मंदिर परिसराची सेवाभावाने स्वच्छता केली. रामदास मस्के सिक्युरिटी गार्ड यांनी सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले. या धार्मिक भक्तिमय वातावरणा मुळे भाविक लोक भारावून गेले होते. व्यवस्थापन मंडळाच्या वतीने सेवाभावाने केलेल्या व्यवस्थेबद्दल सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कल्याणच्या साई भक्तांनी व्यवस्थापन मंडळाचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
अशी माहिती ॲड. मुकुंदराव दिनकरराव चौधरी कार्यकारी अधिकारी यांनी दिली.









