प्रा. आ. केंद्र नेरी तर्फे अरुणोदय सिकलसेल समुपदेशन शिबिर संपन्न

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
आज दिनांक २० जानेवारी रोजी ‘अरुणोदय’
सिकलसेल विषयक समुपदेशन (माहिती, शिक्षण व जनजागृती) उपक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर मार्फत राबविण्यात आला . या उपक्रमादरम्यान सर्वांना सिकलसेल आजाराचे महत्त्व, त्याची लक्षणे तसेच आजाराचा प्रसार कसा होतो याबाबत सविस्तर माहिती देण्यातआली.सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान 15 जानेवारी ते 7 फरवरी 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये 0 ते 40 वयोगटातील सर्व व्यक्तींची सिकलसेल करिता तपासणी व गरजेनुसार औषध उपचार करण्यात येणार आहे.

सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून हा आजार जन्मताच मुलांमध्ये असतो. सिकलसेल रुग्णानी स्वतःची काळजी घेतल्यास त्यांना सामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगता येते. सिकलसेल अॅनेमियाची प्रमुख लक्षणे
सतत थकवा येणे, डोळ्यांचे विकार व पिवळसरपणा, पाठदुखी, कंबरदुखी व सांधेदुखी, कावीळ, हाता-पायाला घाम येणे अशी सामान्यपणे सिकलसेल अॅनेमियाचो प्रमुख लक्षणे आहेत. रुग्णाच्या हातापायावर सूज येणे, सांधे सुजणे व तीव्र वेदना होणे प्लीहा (तिल्ली) मोठी होणे. सर्दी-खोकला वारंवार होणे. अंगात बारीक ताप असणे. लवकर थकवा, चेहरा निस्तेज दिसणे, डोळे पिवळसर दिसणे हिमोग्लोबीन ७ टक्के पेक्षा कमी अशी लक्षणे सिकलसेल रुग्णात दिसून येतात.त्यात वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार, वेळेवर औषध उपचार, अति जागरण टाळावे, पाणी दिवसातून चार ते पाच लिटर प्यावे. आरोग्याची काळजी घ्यावी. असे प्रतिवादन नेरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तेलमासरे यांनी केले.
सदर मोहिमेत सक्रिय सहभाग होऊन उपचार व समुपदेशन करण्यात आले. आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी ,परिचारिका ,आशा , आरोग्य सेवक.प्रयोग शाळा तंत्रद्य.यांचा विशेष अभियान यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेत आहे. या वेळी प्रा. आरोग्य केंद्र नेरी येथील वैद्यकीय अधिकारी. डॉ. कामडी मॅडम आणि डॉ.मनोज तेलमासारे, शीतल पिसे मॅडम.(फ्लेबोटोमिस्ट) , आरोग्य सेवक. भगवान वाघ, सुमित ठेंगणे, माधुरी हेमके आ.सेविका , नसरीन बानो (LHV) आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.








