सरडपार गाव सहा वर्षापासून ग्राम पंचायत निवडनुकी पासून वंचित

प्रतिनिधी: रामचंद्र कामडी नेरी
तालुका चिमुर जिल्हा चंद्रपूर मध्ये येत असलेल्या सरडपार गावाला शासनाने वाऱ्यावर सोडले असून या गावाला 6 वर्षा पासुन ग्राम पंचायत तिच्या निवडणूक पासुन वंचित ठेवण्यात आले आहे. चिमुर शहरापासून 10 किलोमीटर असलेल्या सरडपार या गावची गट ग्राम पंचायत काग ही होती परंतु चिमूरला 2015 मध्ये नगर परीषदचा दर्जा मिळालामुळे नगर परिषदला काग व सोनेगाव ग्राम पंचायत मधील गावे समाविष्ट करण्यात आली सरडपार गाव 2015 ते आजपर्यंत कुठेही जोडल्या गेले नाही. त्यामुळे सरडपाार जनता शासनाच्या निधी पासुन वंचित राहिले, या संदर्भात चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार भांगडिया. गट विकास अधिकारी चिमूर, तहसिलदार तहसील कार्यालय चिमूर, जिल्हा अधिकारी चंद्रपूर, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांना निवेदन देण्यात आले असून मेल द्वारे सुध्दा कळविण्यात आले आहे .तरी या गावची दखल 2015 पासुन कोणी घेतली नाही.याचा त्रास सरडपार गाव वाशीयांना होत आहे. प्रशासनाने आता तरी अधिक लक्ष केंद्रीत करुन सरडपार गाव वाशीयांना हक्काचे ग्राम पंचायत दयावे. अशी विनंती आज 13/03/23 ला गाव वाशियांच्या वतीने अजय खोब्रागडे, कायभरोशा पाटील, अरविंद देवतळे, दयाराम कुंभरे, कविता ननावरे,सीमा शेरकुरे, माला सहारे, मंगला घोडमारे, शीतल कुंभरे, सविता सहारे आणि अन्य नागरिकांनी केली आहे .