मानवत येथे ‘जय बजरंग कुस्ती संकुल’चे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत परिसरातील कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘जय बजरंग कुस्ती संकुल’चे भव्य भूमिपूजन व उद्घाटन समारंभ सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय नगरसेवक मा. दीपक बारहाटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक मा. दीपकभैय्या बारहाटे होते, तर डॉ. राजेश दहे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सदाशिव हागळे सर यांनी केले.
कार्यक्रमाचा तपशील :
दिनांक : १९ जानेवारी २०२६, सोमवार
वेळ : सकाळी १०.३० वाजता
स्थळ : हनुमान मंदिर, त्रिमूर्ती नगर, मानवत
यावेळी मा. किशोरभाऊ ढगे, मा. आकाशभैया चोखट, मा. राजेशभाऊ ढगे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या उपक्रमाचे आयोजन पहलवान अशोक इंद्रोबा चोखट (संस्थापक-अध्यक्ष) यांनी केले. या सोहळ्यास मानवत व परिसरातील मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी, खेळाडू व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी सर्व पहलवान मित्र मंडळ, सारंगपूर यांच्यावतीने मानवत व आसपासच्या सर्व नागरिकांचे तसेच कुस्तीप्रेमींचे आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.









