दगडी कोळसा घेऊन जाणारा ट्रक पलटी

उपसंपादक:विशाल इन्दोरकर
दि 28/01/2026 रोज बुधवार ला नेरी येथे दगडी कोळसा घेऊन जाणारा एम एच 34 बी जी 5267 क्रमांकाचा मोठा ट्रक सायंकाळी 06:15 वाजता उलटला. गावातील शंकरजी देवस्थान कडून गावत येणाऱ्या अरुंद रस्त्यावर गावालगत नदीमध्ये जाणाऱ्या पाटात हा ट्रक रिव्हर्स आणत असताना उलटला. गावचा बाजार असल्याने तिकडन हे ट्रक सरडापार मार्गला जाऊ शकणार नाही या शंकेने चालकाने हे ट्रक या दिशेने आणले. परंतु गाव लागताच त्याला कुठूनही हे ट्रक वळवता आले नसल्याने ते रिव्हर्स घेण्याचे त्याने ठरवले. आणि वापस आणत असताना ते पाटात उलटले. लगेचच गावकऱ्यांनी गर्दी केली. चालकास गावकऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. वृत्त लिखाणापर्यंत या प्रकरणाची माहिती पोलीस प्रशासनापर्यंत पोचविण्यात आलेली नव्हती. अरुंद रस्ता आणि गावची संथ विकासगती यावरही जमावामध्ये चर्चेला उधान आल्याचे दिसले.
आधीच अरुंद रस्ता आणि सोबत जास्तीत जास्त वेळ रस्त्यालगत उभे असणारे ट्रॅक्टर, मशीन आणि इतर वाहनांमुळे तेथील वळणावर नेहमीच अडथडा होत असतो. त्यातच आज झालेल्या अपघातामुळे गावच्या संथ विकासगतीवर जमावामध्ये चर्चेला उधान आल्याचे दिसले.









