निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण यांनी घेतली विविध पथकांची आढावा बैठक…

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 17 जानेवारी रोजी जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणूक 2026 पाथरी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी पाथरी श्रीमती संगीता चव्हाण यांनी निवडणूक कामकाज ,नियोजनबद्ध व सुरुळीत पार पाडण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती केली असून यामध्ये आचारसंहिता पथक,मिडिया पथक,वाहन पथक,कर्मचारी प्रशिक्षण पथक, स्वीप पथक,खर्च पथक,साहित्य वाटप पथक,ईव्हीएम पथक, टपाली मतदान पथक सह इतर पथकांचा समावेश आहे.या सर्व पथकातील अधिकारी,कर्मचारी यांची आढावा बैठक तहसील कार्यालय येथे घेऊन यामध्ये त्यांना महत्वपूर्ण सूचना दिल्या.तसेच त्यांना नेमून दिलेले कामकाज करण्याबाबत उपस्थित राहून दैनंदिन कामकाज करण्याबाबत आदेशित केले. अनुपस्थिती ची गंभीर दखल घेण्यात येईल असे ही सुचवले.यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पाथरी श्री शंकर एन हांदेशवार,गटविकास अधिकारी श्री शैलेश वाव्हळे,नायब तहसीलदार श्री रमेश धोपे, श्री वसंत महाजन, सहाय्यक महसूल अधिकारी श्री रघुनाथ केसकर,मिडिया नोडल अधिकारी श्री संदीपान घुंबरे सह सर्व पथकातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.









