पाथरी येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकीत मिळण्यासाठी मा. उपविभागिय अधिकारी यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिंनाक 21/10/2021 गुरुवाररोजी मा.उपविभागिय अधिकारी श्री.दर्शन निकाळजे यांना निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी कार्यालय पाथरी,द्रारा, मा,साखर आयुक्त साखर संकुलन शिवाजीनगर पुणे,पाथरी तालुक्यातील गळीत हंगाम2020-21 मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकित FRP रकमेची बाकी बेकायदेशीरपणे जमा केलेले शेअर्स अनामत रक्कम व अन्य थकीत देणे मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन गळीत हंगाम 2020-21. कालावधीतील पाथरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या दिनांक26 ऑगस्ट 2020च्या आदेशीतील तरतुदी अनुसार उसाची FRP रक्कम अदा करण्यात आली नाही काही कारखान्यांनी साखर हेतुत साखर उताराची देखील चोरी केली आहे आधीच नैसर्गिक आपत्तीने भरडगेलेली शेतकऱ्यांना गळीत हंगामा 2020-21 ची अतीम ऊस बिलाची रक्कम दिल्याशिवाय गाळप परवाना देणार नाही असे महाराष्ट्र शासनाने घोषित केले आहे परंतु त्याची अंमलबजावणी न करता धडाधडा बॉयलर प्रदिप्न कार्यक्रम मंत्री आणि नेते मंडळींनी दिमाखात सुरू केले आहेत पाथरी येथीलसाखर उत्पादनात जगातील चौथ्या क्रमांकावरअसलेल्या WAImAR या कापेरिट गुपच्या ताब्यातील श्री रेणुका शुगर लि, देवनांद्रा ता,पाथरी शेतकऱ्याची फसवणूक चालवले आहे सायखेडा येथील पूर्वीचा महाराष्ट्र शुगर साखर कारखान्याने मोठ्या प्रमाणावर शेअर्स पोटी अनामत रक्कम जमा केली आणि चुकीच्या तळेबंदी व तेरीज पत्रक यावर कारखाना विक्रीचे व्यवहार करून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे महाराष्ट्र शुगर कडील अद्यापही ऊस बिल मोठ्या प्रमाणावर आहे रिझर्व बँकेच्या परिपत्रकाच्या दुरुपयोग करीत हजारो शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज प्रकरण काढीत गंगाखेड शुगर कारखान्यांना संचालकांनी फसवणूक केली यामुळे पीक कर्ज मिळण्यास देखील शेतकरी दुरापास्त झाले आहे ऊस बिलाच्या रकमेवर दरोडा टाकणाऱ्या हेतुने आज सर्वसामान्य ऊस उत्पादक उसाचे गाळप होणार की नाही आशी भीती पसरली जात आहे जेणेकरून शेतकऱ्याच्या थकितFRP बाबत आवाज उठवु नये ,
सदर प्रकरणी पुढील मागण्या मागण्या केल्या आहेत मागण्यांबाबत शासनाने तात्काळ उपाय योजना करुन शेतकऱ्यांना गळीत हंगाम 2020-21 मधील थकीतFRP व अन्य मागण्या पूर्ण न केल्यास ऊस उत्पादक शेतकरी उग्र आंदोलन करावे लागेल असे निवेदनात म्हटले आहे .
निवेदनातील मागण्या
1) गळीत हंगाम 2020-21 मधील थकीत FRP रक्कम व अंतिम ऊस बिल अदा करा,
2) गळीत हगाम 2020-21मधील थकीत FRPव अतिम ऊस बिल अदा करा.
3) महाराष्ट्र शुगर आणि टुवेन्टीवन शुगर याच्यातील व्यवहाराची च़ौकशी करा शेतकऱ्याच्या शेअर्स पोटी अनामत रकमेच्या टुवेन्टीवन शुगर कंपनीवर बोजा चढवा शेतकऱ्यांच्या अनामत रक्कम मिळवून द्या.
4) walmar. या कापेरिट गुपच्या ताब्यातील श्री रेणुका शुगर लि देवनांद्रा पाथरी कडील थकीत ,FRP तात्काळ अदा करा.
5) गंगाखेड शुगर कारखान्याची कर्जामुळे पिक कर्ज वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना शासनाची हमीद्वारेपिक कर्ज सुविधा द्या.
6) तोडणी व वाहतुकीच्या अवास्तव खर्च दाखवून शेतकऱ्यांना FRP ची चोरी करणाऱ्या साखर कारखाना विरोधात कारवाई करा.
7) सर्व खाजगी कारखान्यावर शासन लेखी परीक्षा द्वारे पारदर्शक आर्थिक व्यवहाराची हमी द्या.
8) वेळेत एफ आर पी न दिलेल्या पाथरी तालुक्यातील सर्व कारखान्यावर दंडात्मक कारवाई करा.
9) गाळप हंगामापूर्वी थकबाकी अदा,न करणाऱ्या कारखान्यावर गाळप परवाना निलंबित करा.
10) ज्या ज्या साखर कारखान्यांनी पाचवी येथील गट ऑफिस यावर्षी बंद केले आहेत त्यांना येथुन पुढे पाथरी येथे गट ऑफिस उघडू दिले जाणार नाही.
11) माजलगाव तालुक्यातील एन एस एल शुगर च्या मॅनेजमेंट कडे लेखीतक्रार केली आहे तालुक्यात बाहेरील ऊस गळापासआणु नये ही मागणी पुर्णे नियम बाहय आहे साखर कारखाना प्लाटच्या 40 कि.मी. आतील ऊस आणण्यास बंदी ही कायद्यात नाही तरी संबंधित तक्रारदास विरोधात कायदेशीर कारवाई करा अश्या अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
निवेदन देतांना कॉम्रेड ज्ञानेश्वर काळे
तालुका सेक्रेटरी भा.क.प. पाथरी
कॉ,नवनाथ कोल्हे कॉ,मुजाभाऊ लिपणे कॉ,विलास दळवे कॉ,अनिस शेख कॉ, ज्ञानेश्वर रबुज कॉ,बडेसाहब कॉ,तुकाराम शिंदे कॉ,आगद भोरे कॉ,सुधिर कोल्हे कॉ, हानुमान वाकणकर कॉ, विजयसिह कोल्हे कॉ,कल्यान आमले व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.