खडाळा शाळेचे घवघवीत यश
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
जिल्हास्तरीय अक्षर आनंद पुस्तक वाचन स्पर्धेत पूर्णा तालुक्यातील फुलकळस केंद्र अंतर्गत असलेल्या खडाळा शाळेने घवघवीत यश प्राप्त केले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अक्षर आनंद पुस्तक वाचन स्पर्धा जिल्हास्तरवर आयोजित करण्यात आली होती.
प्राथमिक वउच्च प्राथमिक गटातील उत्कृष्ट बाल वाचकांचा गौरव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय संपन्न झाला.
खडाळा शाळेतील इयत्ता सातवीतील कु.वेदिका लक्ष्मण शिंदे प्रथम,राणी अंगद शिंदे द्वितीय,साक्षी नागनाथ बेंडे तृतीय,तर सारिका शिवराम शिंदे यांचा उत्कृष्ट बालवाचक म्हणून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सय्यद होते प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.दिलीप शृंगारपुतळे, मुख्याध्यापक सय्यद पटेल,कैलास सुरवसे मुख्याध्यापिका अर्चना सोमवंशी राजू पांचाळ आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास सुरवसे यांनी केले. यावेळी अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे विनोद शेंडगे यांनी विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार कसे करावेत याबद्दल मार्गदर्शन केले डॉ.दिलीप शृंगारपुतळे यांनी विद्यार्थ्यांच्या जाणिवा प्रगल्भ करण्यासाठी वाचन संस्कार किती महत्त्वाचे याविषयी मार्गदर्शन केले याप्रसंगी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,ग्रंथ भेट देऊन निवड झालेल्या उत्कृष्ट बालवाचक यांचा गौरव करण्यात आला शाळेच्या यशाबद्दल शिक्षणाधिकारी विठ्ठलराव भुसारे, गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर, केंद्रप्रमुख सिद्धार्थ मस्के, केंद्रीय प्राथमिक शाळा फुलकळसचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक दयानंद स्वामी,खडाळा शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव जाधव आदींनी अभिनंदन केले आहे.
सर्व स्तरातून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.