शिवाजी पब्लिक स्कूल येथे क्रीडा व सांस्कृतिक स्नेहसंमेलन तसेच बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन संपन्न

श
प्रतिनिधी : प्रा. विश्वनाथ मस्के
शिवाजी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, भिसी येथे क्रीडा व सांस्कृतिक स्नेहसंमेलन तसेच बाल आनंद मेळाव्याचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. रमेशकुमार गजभे (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) होते.
प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री रमेशजी बानकर, मा. अतुलजी पारवे उपस्थित होते. तसेच संस्थेचे प्राचार्य शिरभये सर, प्रा. नितेश सर, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप आनंदी व उत्साही वातावरणात झाला.









