ताज्या घडामोडी
ग्रामीण रुग्णालय पाथरी येथे रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक ०७/०३/२०२२ रोजी ग्रामीण रुग्णालय पाथरी जिल्हा परभणी येथे रुग्ण कल्याण समितीची नीयामक बैठकीचे आयोजन करण्यात करण्यात आले.
सदर बैठकच्या अध्यक्ष स्थानी डॉ. बी.एस.नागरगोजे. जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा रुग्णालय परभणी होते तर सदस्य सचिव रू. क.स. म्हणून डॉ सुमंत वाघ (वैद्यकीय अधीक्षक ग्रा.रू. पथरी) तसेच श्री अनीलराव सखारमजी नखाते, अली अफसर अली अकबर अन्सारी,श्री सदाशिव नाथा थोरात व अन्य सदस्य उपस्थित होते.