चक्रधर स्वामी माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
तालुक्यातील कानसुर येथीलह
चक्रधर स्वामी माध्यमिक विद्यालयात दि. 12 जानेवारी रोजी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मा. श्री वसेकर सर होते, तर श्री. प्रसाद राव काळे सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. वक्त्यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ यांच्या आदर्श मातृत्वावर तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारा सकारात्मक प्रभाव यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, चारित्र्यनिर्माण व आदर्श मूल्यांची जाणीव निर्माण झाली.









