क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आलेसुरचे सुयश

प्रतिनिधी::विश्वनाथ मस्के
सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव अंतर्गत चणकापुर, सावनेर (नागपूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या लंगडी क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आलेसुर येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत लंगडी या क्रीडा प्रकारात (कनिष्ठ गट)प्रथम पारितोषिक पटकावले.
या उल्लेखनीय यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक माननीय गिरडकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच दडमल सर व बनसोडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देत योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल आत्मविश्वास व संघभावना निर्माण झाली.
या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्गात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शाळेच्या या यशामुळे परिसरात क्रीडा व शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी संदेश गेला आहे.









