श्रीसाईबाबांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी ते पंढरपुर पायी दिंडीचे टाळमृदंगाच्या गजरात प्रस्थान झाले. दिंडी निघण्यापूर्वी श्रीसाई स्मारक समिती पाथरीचे विश्वस्त श्री संजय भुसारी यांच्या सुविद्य पत्नी सौ नीलिमा भुसारी व मंदिर प्रमुख सौ छाया कुलकर्णी यांच्या शुभहस्ते रथातील श्रीसाईबाबांचे औक्षण करण्यात आले, प्रसंगी समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण कुलकर्णी, दिंडी प्रमुख तथा कार्यकारी अधिकारी अॅड. श्री मुकुंदराव चौधरी, परम साई भक्त श्री नागेंद्रजी अनंतवार, कार्यकारी विश्वस्त अॅड. अतुलराव चौधरी, प्रताप आमले, प्रभाकर पाटील, प्रसिद्ध भारूडकार त्रिंबक महाराज आमले, मोहन महाराज पोकळघट, मनोहर महाराज थोरे, प्रकाशराव धर्मे, मारुती चिंचाणे, सुधाकर बेदरे व मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.
पूर्ण देशभरातून ही एकमेव साईबाबांची दिंडी आहे जी पंढरपूरला पायी जाते, गेल्या २१ वर्षांपासून समितीने ही परंपरा जोपासली आहे. या दिंडीत जाणाऱ्या भक्तांकडून वारकर्यांकडून कुठलीही ही फिस आकारल्या जात नाही साईभक्तांसाठी ही दिंडी पूर्णतः मोफत असते.
ही दिंडी साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथून निघताना सर्वप्रथम श्रीसाईबाबांचे कुलदैवत असलेल्या माळीवाडा येथील पंचबावडी हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन, श्री पंकज मैराळ यांच्या मळ्यात चहा पाण्याचा कार्यक्रम झाला तिथून पुढे श्री महादेवराव खारकर यांचा मळ्यात श्री साईबाबांची आरती व दुपारच्या जेवणाचा कार्यक्रम झाला नंतर श्री कुंडलिक लव्हाळे यांच्याकडे दुग्ध पानाचा कार्यक्रम झाला.
या दिंडीला व श्री साईबाबांच्या रथाला निरोप देण्यासाठी पाथरी शहरातील मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्रित आला होता. तसेच या दिंडीचे अध्यक्ष तथा कार्यकारी अधिकारी अॅड. श्री मुकुंदराव चौधरी, श्री साई स्मारक समिती पाथरी चे कार्यकारी विश्वस्त मा.अॅड. श्री अतुलराव चौधरी, कोषाध्यक्ष विश्वस्त मा. श्री सूर्यभानजी सांगडे तसेच त्यांच्या स्नुशा श्रीमती माधवी सांगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री नारायण कुलकर्णी, परम साईभक्त परभणीचे मा. श्री नागेन्द्र आनंतवार, श्री प्रताप आमले, सौ शिवकन्या नागठाणे, सौ जयश्री वाघमारे, सौ कमलबाई तेलंगे व आदी मान्यवर उपस्थित होते. मागच्या वर्षी कोरोना काळातील लॉकडाऊन मुळे ही दिंडी मोजक्या वारकऱ्यांसह परमपूज्य श्री साईबाबांच्या दिव्य पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी घेऊन जीपने गेली होती. लॉकडाऊन नंतर प्रथमच पुन्हा त्याच स्फूर्तीने वारकऱ्यांच्या मोठ्या संख्येसह ही दिंडी पायी पंढरपूर पूरकडे प्रस्थान झाली आहे, अशी माहिती समितीचे विश्वस्त श्री संजय भुसारे यांनी दिली.