आलेसुर येथे भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा व गुरुदेव प्रचार कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी:प्रा. विश्वनाथ मस्के
भिवापूर तालुक्यातील आलेसूर येथे सत्संग भजन मंडळ आलेसुर व ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने वंदनीय तुकडोजी महाराज पुण्यस्मरण निमित्ताने भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा व गुरुदेव प्रचार कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाचे उदघाटक श्री गुरुदेव महाराष्ट्र राज्य युवा मंचचे संस्थापक ज्ञानेश्वरदादा रक्षक तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र कृषी भुषण पुरस्कार प्राप्त मोरेश्वर झाडे, माजी सैनिक देविदास लाखे,वर्धा जिल्हा प्रचारक विष्णू ब्राम्हणवाडे,माजी वर्धा जिल्हा प्रचारक नारायण खाडे,गुरुदेव प्रचारक दादाजी कुबडे,प्रमोद हिवंज,सरपंच दिलीप दोडके,रसराज राजनहिरे इत्यादी उपस्थित होते.राष्ट्रभक्ती,राष्ट्रीय एकात्मता,व्यसनमुक्ती,या विषयावरती शहरी महिला गट,पुरुष गट,बाल गट व गाव -खेड्याकरिता ग्रामीण गट करिता भजन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.सहभागी प्रत्येक भजनी मंडळी यांना ग्रामगितेतील अध्यायावरती ओवी,प्रतिमा व अध्यायाच्या नावावरती प्रश्न विचारल्या जात होती.महाराष्ट्रातील वर्धा,नागपूर,वाशीम, अकोला,यवतमाळ बुलढाणा,अमरावती, गडचिरोली व चंद्रपूर मधील भजनी मंडळीने स्पर्धेत सहभाग घेतला होता.गावातील भिंतीवरती ग्रामगितेतील लावलेल्या ओव्या व गावाची नैसर्गिकरित्या केलेली आकर्षक सजावट सर्वांच मन वेधून घेणारे होते.काही जिल्यातील ज्या गावामध्ये नित्यनियमाने सामुदायिक प्रार्थना,रामधून व ध्यान करीत असतात अशा गुरुदेव सेवा मंडळाचा सत्कार करण्यात आला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व सर्व संत महापुरुष यांचे विचार तळागाळातील सामान्य व्यक्तीपर्यंत पोहचावे.लोकांमध्ये जनजागृती होऊन प्रत्येकांचे हात राष्ट्रनिर्माण व गाव निर्मितीसाठी समोर यावेत.आलेसूर येथील नागरिकांत असलेली सहकार्य वृत्तीमुळे आज गावातील प्रत्येक व्यक्ती ही एकोप्याने नांदतात.हाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा विजय आहे.इत्यादी मत ज्ञानेश्वर रक्षक यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुभाष नन्नावरे यांनी केले तर आभारप्रदर्शन अंकेश गायकवाड ने मानले.









