अहेरी मध्ये जगमेरिनम सत्यम शुटिंगचे भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते उदघाटन

अहेरीत तीन दिवस शूटिंग चालणार
साऊथियन सुपरस्टार रवी तेजा यांचा भाचा ऍक्टर आहे
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
टॉलीवुड (इंडियन मूवी)मधील जगमेरिना सत्यम नावाचे फिल्म शूटिंगचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते शनिवारी येथील रुग्णालय परिसरात उदघाटन करण्यात आले.
तेलंगु सुपर स्टार (साऊथियन अभिनेता) रवी तेजा यांचा भाचा ऍक्टर असून शूटिंग अहेरी शहर व परिसरात तीन दिवस चालणार असून शनिवारी अहेरी उपजिल्हा रुग्णालय समोरील परिसरात शूटिंग करण्यात आले, आता पुढे तहसील कार्यालय परिसर व अन्य ठिकाणी शूटिंग करण्यात येणार असल्याची माहिती असून सतत तीन दिवस जगमेरिना सत्यम नावाचे फिक्चरचे शूटिंग चालणार आहे.
शूटिंग उदघाटनाच्यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्यासमवेत पूर्वाताई दोंतूलवार, ममता पटवर्धन, सारिका गडपल्लीवार, शैलेश पटवर्धन, संदीप सुखदेवे, संतोष तोरे आदी व अन्य प्रेक्षकगण उपस्थित होते. पहिल्या दिवशी शूटिंगला भरभरून प्रतिसाद मिळाला.