राज्यपाल भगतसिंह ‘कोशियारी’ यांना राष्ट्रवादी युवक काँग्रसने पाठविले एक हजार पत्र

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
घटनात्मक पदावरील व्यक्तीवर खटला दाखल करता येत नाही म्हनून सातत्याने आगाऊ, असंवेदनशील, मूर्खपणाचे, अविवेकी, बेताल, प्रक्षोभक, राजकारनाने प्रेरित वक्तव्य व वागणूक राज्यपाल भगतसिंग ‘कोशियारी’ करीत असल्याने ते महाराष्ट्र राज्याकरिता “विषारी” आहे? असा समज आता राज्यातील जनतेला झाला आहे.
राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल याअगोदर सुद्धा अनेकदा खालच्या स्तरावर आक्षेपार्ह वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांच्यातर्फे करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी तर मा. राज्यपाल महोदय यांनी गुजरात व राजस्थानी नागरिकांबद्दल बोलत असताना राज्यातील मराठी माणसांच्या कर्तुत्व व नेतृत्वाबद्दल अतिशय बेताल वक्तव्य करीत महाराष्ट्रा संदर्भात आपला द्वेष व्यक्त केला.
सततच्या या मूर्खपणा व प्रक्षोभकपनाच्या वक्तव्या बाबत जाब विचारण्यासाठी तसेच कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. महेबुब भाई शेख यांच्या निर्देशानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने १ ऑगस्ट २०२२ पासून १० लाख पत्र राज्यभरातून पाठविण्याची मोहीम सुरू करण्यात आली.
याच अनुषंगाने आज चंद्रपूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा भद्रावती विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने १ हजार पत्र राज्यपालांना पाठविले.
राज्यपालांच्या या सततच्या अविवेकी, प्रक्षोभक, बेताल व मूर्खपणाच्या वक्तव्याला कंटाळून अनेक कायदेतज्ञ व अभ्यासकांनी “राज्यातील नागरिकांनी जर राष्ट्रपतींना राज्यपालांच्या चुकीच्या व भडकविणाऱ्या वक्तव्यांबद्दल, अनियंत्रित वागणूकीबद्दल लेखी तक्रारी केल्या व राष्ट्रपतींना सामान्य नागरिकांनी राज्यपालांच्या विरुद्ध तक्रार करण्याची परवानगी मागितली तर तसे एक नागरी आंदोलन सुद्धा महत्वाचे ठरेल” असे उघड मत व्यक्त केले आहे.
अश्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज आंदोलन करणे गरजेचे असल्यानेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे तब्बल १ हजार पत्र पाठविण्यात आले.
अभिजित प्रभाकरराव कुडे व दिनेश मोहारे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजित कुडे, तालुका अध्यक्ष दिनेश मोहारे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष चंद्रकांत कुंभारे,सागर पुंडकर , राजकुमार मोहारे, सागर दमाहे , विक्की पानघाटे, कुणाल गौळकर, पंकज मांडवकर, ऋषिकेश पाटील यांची उपस्थित होती.