शहीद वीर बाबूराव शेडमाके यांची १८२ जयंती साजरी

प्रतिनिधीःराहुल गहुकर
गोंडवाणा प्राण हितेचा पुत्र शहीद वीर बाबूराव शेडमाके यांची १८२ वी जयंती चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथे साजरी करण्यात आली. दरम्यान, सेवा सेवाच्या गजराने वीर बाबूराव शेडमाके यांना आदरांजली वाहिली.
गोंडी परंपरेने बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून चौकातील फलकाला माल्यार्पण केले. पेरसापेन सुमरण व बाबूराव शेडमाके यांचा रेला पाटा म्हणून त्यांच्या कार्याची आठवण करण्यात आली. ‘बाबूराव शेडमाके अमर रहे, अमर रहे’ असा जयजयकार करीत आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी गौरी मरस्कोल्हे,वनिता मरस्कोल्हे, प्रणाली वरखडे,विना वरखडे,गीता मरस्कोल्हे, नमिता मसराम, उषा कुमरे,शशिकला मडावी,आदिमाया मसराम, कानुपात्रा कन्नाके,दुर्गा मरस्कोल्हे,मीराबाई मरस्कोल्हे धुरपता वरखडे व मोना वरखडे व युवा कमिटीचे अध्यक्ष आयु. प्रफुल वरखडे व श्रावनजी कुमरे,स्वप्नील मसराम व आदी.मान्यवर उपस्थित होते.