ताज्या घडामोडी

रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

दि. १२ जून २०२२ रोज सकाळी १०:३० वाजता नेरी येथील शेतकरी डोनु महागु गजभे (८० वर्ष) हा आपल्या शेतात गौरखेडा येथे काम करीत असताना रानडुक्कराने हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यात त्यांच्या डाव्या मांडीला व कमरेला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांनी आरडाओरडा केली. शेताजवळील शेतकरी यांनी घटनास्थळी धाव घेताच डुक्कर पळून गेल्यामुळे पुढील अनर्थ टळला नेरी ग्रामपंचायत सदस्य नानाजी दडमल व इतर शेतकरी यांनी जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे उपचारासाठी भरती केले. प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे प्राथमिक उपचार करून दुखापत अतिगंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे लिपिक अरुण वासुदेव सहारे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींना दिलासा दिला. ऐन हंगामाच्या तोंडावर घरातील कर्त्या पुरुष जखमी झाल्यामुळे त्यांचे कुटुंब हे आर्थिक संकटात सापडलेले आहे त्यामुळे वनविभागाने संबंधित शेतकरी डोनु महागु गजभे यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी नेरी गावकऱ्यांनी केलेली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close