जुगार अड्यावर पोलीसाची धाड 5 आरोपी ताब्यात काही फरार
प्रतिनिधी : संजय नागदेवे तिरोडा
प्रसिद्ध असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावर मॉ संतोषी माता मंदिराच्या मागे करटी खुर्द येथे चालत असलेल्या अवैध जुगार अड्यावर पोलीसानी धाड टाकुन पाच जुगारी ईसमांना ताब्यात घेतले व काही ईसम फरार झाल्याचे सागणयात आले.
प्राप्त माहीती नुसार करटी खुर्द येथे जुगारी ईसम हे हार जीत चा जुगार खेळत असल्याची माहीती पोलीसाना मिळाली. त्या माहीती वरुन पोलीसांनी वरील घटना स्थळ गाठले व जुगाऱ्यांना पकडण्यात यशस्वी झाले व 5 जुगारींना पकडले व त्यांच्याकडुन 1,13,650 रुपये चा मुद्देमाल जप्त करुन 5 जुगारींना ताब्यात घेतले व काही ईसम पळून गेले. सापडलेल्या ईसमांचे नाव ओमकार पुंडलीक गावंडे 46, वसंत महादेव कडु 52 ,जितेंद्र प्रभुदास घरजारे 30 ,अनंत गोपाल श्रीरंग 34, सोमेश्वर कुडलीक गावंडे 38 सर्व रा. करटी खु. चे जुगार खेऴताना मिळुन आले. त्याच्या जवळून 52 तासपत्ते नगदी 2300 रूपये ,3 मोबाईल हॅन्ड सेट व 3 मोटार सायकल असा एकूण 1,13,650 रूपयांचा मुद्देमाल जप्त करन्यात आला. वरील आरोपी विरूद्ध कलम 12 अ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा अन्वये कारवाही केलेली आहे. या मधे घटना स्थळ वरून पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
सदर कारवाही मा. नितीन यादव उप विभागीय पोलीस अधिकारी तिरोडा यांच्या मार्गदर्शना खाली योगेश पारधी पोलीस निरीक्षक तिरोडा.राधा लाळे ,राकशे , मुकेश थेर , वाढे , सवालाखे व इरफान शेख यांनी केली.