चिमूर तालुक्यात विज्ञान शाखेतून जीविका इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजची प्रणाली प्रथम

प्रतिनिधी: रामचंद्र कामडी
चिमूर तालुक्यातील
भिसी येथील जिविका इंग्लीश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज ची विद्यार्थिनी बाजी मारीत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत संपूर्ण चिमूर तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान प्रणाली संतोष भुजाडे 74.50टक्के गुण घेऊन मिळविला आहे. तर कू. साईली बाबा रेवतकर ही महाविद्यायातून दूसरी आलेली आहे तसेच कू. आकांशा मुरलीधर गोन्नाडे हिने महाविद्यालयातुन तिसरा क्रमांक मिळविला आहे .तसेच जिविका कनिष्ठ महविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी जीविका इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कठोर परिश्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला घडविण्याचे किमया करीत आहे . शहरी तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रगतीच्या मार्गाने वाट दाखवण्यासाठी तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला यशस्वी करणे, त्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष व सदस्यांनी बोलून दाखवले. जीविका इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी सुद्धा जिद्द व चिकाटीने परिश्रम घेतल्याने हे यश संपादित झालेल्या आहेत सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महाविद्यालयाच्या वतीने गुणवत्ता प्राप्त विद्यार्थांचां सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री ईश्वर गजभिये , इतर पदाधिकारी व सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.