पाथरीतील साईबाबा जन्मस्थान मंदिरात पत्रकार सौ.रेखाताई मनेरे , उद्धव इंगळे यांचा व प्रकाश लालझरे यांचा संयुक्त सत्कार

प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पत्रकार संरक्षण समितीच्या पाथरी तालुका अध्यक्ष पदी निवड, झाल्या बद्दल भव्य सत्कार समारंभ
पाथरी – सविस्तर वृत्त असे की पत्रकार संरक्षण समितीच्या पाथरी तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दैनिक कलमवीरच्या तालुका प्रतिनिधी सौ. रेखाताई मनेरे यांचा भव्य सत्कार सोहळा साईबाबा जन्मस्थान मंदिर येथे उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात पत्रकार मा. प्रकाश लालझरे (BPL न्यूज चॅनल, मुख्य संपादक परभणी जिल्हा व मा. उद्धव इंगळे (नवराष्ट्र दैनिक, पाथरी तालुका प्रतिनिधी) यांचाही संयुक्त सत्कार करण्यात आला.
दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी मंदिर परिसरात आयोजित या कार्यक्रमाला साईबाबा ट्रस्टचे सचिव तथा व्यवस्थापकीय विश्वस्त मा. अॅड अतुल दिनकरराव चौधरी, संभाजीनगर येथील विश्वस्त मा. संजय दत्त भूसारी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. नीलिमा भूसारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी पाथरी शहर व परिसरातील विकासकामांच्या प्रगतीबाबत पत्रकार व ट्रस्ट पदाधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारितेद्वारे सकारात्मक भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांचा गौरव व्हावा, या उद्देशाने व्यवस्थापन मंडळाच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी एन. के. कुलकर्णी तसेच मंदिर अधीक्षिका सौ. छाया कुलकर्णी यांच्या शिफारशीवरून या तिघा पत्रकारांचा शाल, श्रीफळ,
नारळ व साईबाबा जन्मस्थान मंदिराची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. साई प्रसादाच्या स्वरूपात सर्व मान्यवरांचा यथोचित करण्यात आला.
सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेचे समाजजीवनातील महत्त्व अधोरेखित करताना, निर्भीड व विधायक पत्रकारितेची आज अधिक गरज
असल्याचे मत व्यक्त केले. पत्रकारांनी विकासकामांवर लक्ष ठेवून सकारात्मक टीका व विधायक सूचनांद्वारे प्रशासनाला दिशा द्यावी, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार संरक्षण समितीच्या पाथरी तालुका अध्यक्षा सौ. रेखा मनेरे यांनी सर्व मान्यवर, ट्रस्ट पदाधिकारी व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. समाजहितासाठी प्रामाणिक व निडर पत्रकारिता करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. दैनिक कलमवीरच्या लेखणीतून सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या पत्रकारांचा सन्मान हा केवळ औपचारिक नसून समाजातील जबाबदार माध्यमांची ताकद अधोरेखित करणारा ठरला.









