भिसी येथे भव्य मोफत रोगनिदान शिबिर संपन्न
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
दिनांक19 जुलै 2023 , बुधवारला चिमूर तालुक्यातील
भिसी येथे श्री छत्रपती शाहू महाराज बहू उद्दे. मंडळ भिसी,
शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर , डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी इन्स्टिट्यूट वानाडोंगरी नागपूर .
जीवनदाई आरोग्य विकास फाउंडेशन , यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निशुल्क आरोग्य तपासनी व रोगनिदान पार पडले .
या आरोग्य शिबिरामध्ये भिसी व परिसरातील 921 रुग्णांनी लाभ घेतला .त्यापैकी अतिविशेष म्हणून 128 रुग्ण पुढील उपचाराकरिता उद्या दिनांक 20 जुलै 2023पासून टप्याटप्याने भरती करण्यात येणार आहे , तसेच 81 रुग्णांची ECG करण्यात आली , 224 रुग्णांची शुगर तपासणी करण्यात येऊन औषधी वाटप करण्यात आली .
कार्यक्रमाचे उदघाटक बाबुरावजी बोमेवार माजी अध्यक्ष विठ्ठल रुखमाई देवस्थान भिसी , अध्यक्षस्थानी डॉ.रमेशकुमार गजभे माजी राज्यमंत्री म.रा.,प्रमुख पाहूने म्हणून, प्रकाश राऊत ठाणेदार पोलीस स्टेशन भिसी,घनश्याम डुकरे, गरिबाजी निमजे अध्यक्ष वि.रू.दे. विजयभाऊ घरत माजी जी.प.सदस्य, सौ. ममताताई डुकरे माजी जी.प. सदस्य. गोपालजी बलदुआ जेष्ठ भाजपा नेते सचिनभाऊ गाडीवार भाजपा नेते कृष्णाजी तेजने भाजपा नेते भिसी, डॉ.पिसे मॅडम , डॉ.हेमंत जुनोजा मेडीसिन, उमेश कडू , राहुल चिंचलकुलवार , डॉ.कमलजीत कौर डॉ.मयूर दुधे चर्मरोग तज्ञ, डॉ. संदीप खंडारे स्त्रीरोग तज्ञ, डॉ. केवल ढोणे सर्जरी म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये प्रा. आनंद भिमटे यांचा झाडीपट्टी नाट्य रंगभूमी मध्ये उत्कृष्ठ नाट्य लेखनाबद्दल व पवन दिघोरे यांचा कला व वाणिज्य महाविद्यालय भिसी आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून बि. ए. अंत्य वर्षाला विशेष प्रविण्याय सह पास झाल्याबददल शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्क्रमाच्या यशस्वितेकरिता बजरंग दल, टायगर ग्रूप, कमांडो ग्रूप व छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सदस्य व हितचिंतकांनी आणि भिसीवासिय जनतेनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर आष्टनकर यांनी तर आभार प्रदर्शन परवेज शेख यांनी केले.