सर्व धर्मीय सर्व पंथीय सामाजिक परिषद चिमूर क्रांती मध्ये संपन्न
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
मागील काही वर्षांपासून शेतीचे संकट अधिक गंभीर होत चालले आहे. १९९१ पासून शेती पद्धतशीरपणे उध्वस्त केली जात आहे. कृषीप्रधान भारत देशात विषाणापासून ते शेतीसाठी लागणारे अवजारे, खते, किटकनाशके या सर्वांसाठी भांडवली गुंतवणूक वाढत गेली आहे. प्रदुषण वाढवण्याच्या या नितीमुळे पर्यावरणाचा समतोल अधिक ढासळला आहे. निसर्गाचा लहरीपणाचा मार खात पीक काढले तर बाजारात शेतमालाला भाव नीट मिळतच नाही. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या बळीराजाला सरकार कडून मदत मिळण्या ऐवजी त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. देशात विशेषतः विदर्भात शेतकऱ्याला. आत्महत्या करायला भाग पाडले जात आहे. आता शेतीपासून बळीराजाला बेदखल करण्यासाठी शेतीला मोठ्या कॉर्पोरेट भांडवलदाराच्या ताब्यात देण्यासाठी केंद्र सरकारने शेती विरोधी कायदे संसदेत कुठलीही चर्चा न करता जबरदस्तीने पास केलेत. गेल्या अनेक वर्षांपासून या देशाची शेती, शेतकरीच सर्व सामान्य माणसाच्या हक्काची भाकर हिरावली जाऊ नये म्हणून हा अन्नदाता दिल्लीच्या वेशीवर उन, वारा, पावसाची पर्वा न करता ठाण मांडून बसला आहे. परंतू कॉर्पोरेट हितसंबंध जपणारे केंद्र सरकार साम, दाम, दंड, भेद निती वापरत लोकशाही संविधानाला नाकारत आहे. बळीराजाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे.
मागील दीड वर्षे कोविड १९ च्या जागतिक महामारीच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला त्रास दिला जात आहे. एकीकडे बुलेट ट्रेन, समृद्धी एक्सप्रेस लादले जात आहे. ताडोबा अभयारण्य खाजगी भांडवलदाराच्या घशात घालून खनिज संपत्ती. लुटण्यासाठी राण मोकळे केले जात आहे. तर दुसरीकडे सामान्यांची रेल्वेचे खाजगीकरण केले . व या देशाच्या कष्टकऱ्या जनतेला हजारो मैल अक्षरश: पायपीट करावी लागली. आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत ऑक्सीजन अभावी अनेक जन आपले प्राण गमवून बसले व अनेकांवर उपासमारीची वेळ आली.पुढच्या पिढीतील बहुजन मुला मुलींना ज्ञानाचे दरवाजे बंद होत आहेत. असे असतांना समाज हितासाठी कार्य करण्याऐवजी राज्यकर्ते कर्ज बुडवे अब्जाधिश उद्योगपतीच्या हितासाठी राबत आहे.
भांडवलशाहीच्या नफा केंद्रीत विकासामुळे निसर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टीला पर्यावरणीय संकटामुळे अवकाळी पावसामुळे , पूर, दुष्काळ हे सामान्य झाले आहे. इतकेच नाही तर कोविड १९ पासून अनेक साथीचे रोग सार्वत्रिक होत आहे. आता संबंध सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
समाजमन कलुषित होत असतानाच्या या काळात जैन, बौद्ध, ख्रिस्ती, सुफी, शिख, लिंगायत, वारकरी, कबीर, गुरुदेव महानुभाव पंथ अशा सर्व भक्ती परंपरा दिपस्तंभाखाली समाजाला दशा आणि दिशा देण्याचे काम करत आहे.
सर्व धर्मीय सर्व पंथीय सामाजिक परिषद चिमूर क्रांती मध्ये
आज दिनांक ३१/१०/२०२१ ला शेतकरी भवन येथे संपन्न झाली.
प्रबोधनाने समाजाला जोडण्याचे कार्य केले गेले. या प्रक्रियेचा पुढील भाग म्हणून स्वातंत्र योगदान दिले.
अशा समृद्ध परंपरेचे आपण सर्व पाईक वर्तमान विषमतेविरुद्ध लडने ही काळाची गरज ठरते तरी या परिषदेला
कार्यक्रमाचे अध्यक्ष
उद्घाटक उपस्थित मान्यवर प.
पुज्य भन्ते ज्ञानज्योती संधरामगीरी , चिमूर , जि. चंद्रपूर, ह.भ.प. बडातात्या कराडकर महाराज, वारकरी सांप्रदाय,
आळंदी.
उपाध्ये कुलभुषण प.पू.प.म. न्यायंबास बाबा शास्त्री महानुभाव, मकरधोकडा नागपूर, आचार्य हरीभाऊजी वेरुळकर दादा, गुरुदेव सेवा मंडळ
डॉ. शेख इकबाल मिन्ने, औरंगाबाद, डॉ. शशी सोनवणे, मुंबई,
सरदार सुखदेवसिंह, पंजाब, ज्ञानेश्वर रक्षक, गुरुदेव सेवा मंडळ,
अशोक सरस्वती, गाडगे महाराज प्रचारक,
अँड. मनोहर पाटील, वरोरा शोभाताई करांडे (सगुणा पाक्षीक), पुणे
रेखाताई महाजन (कबीर पंथ) मालतीताई गेडाम (कल्याण शिक्षण संस्था,नागपूर)
सरदार मलकितसिंह बल (शिव सांप्रदाय), बुद्धनगर गुरुद्वारा, नागपूर,
सज्जनकुमार (राजस्थान)
सुरेश वर्षे, महानुभाव युवा मंच,नागपूर
मोहन कोठेकर, नागपूर, कॉ. पी. एन. भेले, नागपूर.उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यावाचस्पती डॉ. तु.वि.गेडाम यांचा सत्कार करण्यात आला.