ताज्या घडामोडी

कासापुरी गावास शिवसेना युवानेते आसेफ खाँन याची सदिच्छा भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

कासापुरी येथील संत सावता महाराज व विठ्ठल रुक्माई प्राणप्रतिष्ठान व कळस रोहन सोहळ्याच्या निमित्ताने या कार्यक्रमास भेट दिली
यावेळी गावकऱ्यांच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने या मंदिराच्या बाजूला अकरा लाख रुपयांचा भव्य दिव्य संत सावता महाराज सभागृह देण्याची घोषणा यावेळी केली. लवकरच या सभागृहासाठी निधी तात्काळ मंजूर करून या कामास सुरुवात करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी दिली.
गावातील ज्येष्ठ नेते छोटू काका यांच्या मार्गदर्शनाखाली आबा कोल्हे पाटील ,महादेव नवघरे पाटील, व सर्व गावकरी मंडळी यावेळी या कार्यक्रमास उपस्थित होते . यावेळी गावकऱ्यांच्या वतीने शिवसेनेचे नेते आसिफ भैया ,नाना टाकळकर ,अमोल भाले पाटील, प्रमोद नवले यांचा शाल व श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार केला.
कासापुरी येथील या सोहळ्याच्या निमित्ताने या गावातील विकास कामांना गती देण्यासाठी पुढील काळामध्ये नक्कीच प्रयत्न करू विकासाच्या प्रगतीपथावर कासापुरी हे गाव आणू असे यावेळी गावकऱ्यांना बोलताना सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close