वाढदिवस केला आगळा वेगळा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथे साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला कुमारी क्रांती कृण्णा कांबळे हीचा वाढदिवस साजरा करण्यात आला व फुल व केक नाही कापतानी गोरगरिब महिलांना साडयाचे वाटप दि. १५/०८/२०२२ हया रोजी बोरगव्हाण येथे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात
साडयाचे वाटप करण्यात आले आहे सुत्रसंचालन दिनकर कदम यांनी केले
कार्यक्रमाचे उद्घाटक अर्जुन कटारे साहेब जिल्हा मध्यवर्ती बँक सेक्रेटरी शाखा पाथरी व कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवत इंगळे माजी ग्रामपंचायत सदस्य बोरगव्हाण व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाबासाहेब कदम मच्छिंद्र मुळे महादेव कांबळे भागोजी कदम दिनकर कदम इत्यादी, कार्यक्रमासाठी उपस्थित होते प्रास्ताविक करताना पत्रकार कृष्णा कांबळे असे म्हणाले साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करा इतर खर्च करण्यापेक्षा गोरगरीब लोकांना मदत करा असे त्यांनी बोलताना सांगितले आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैभव खुडे यांनी केले आहे.