ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्ती पासुन वंचित

तात्काळ शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी -कवडू लोहकरे यांची मागणी
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभाग अंतर्गत पहिली ते दहावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेट्रिक पुर्व शिष्यवृत्ती योजना राज्य सरकार ने २७ मे २०१९ चा शासन आदेश काढुन सन २०१९-२०२०या शैक्षणिक सत्रापासुन लागु केली. ५० टक्के वाटा केंद्र व ५०टक्के वाटा राज्य सरकार चा राहील. ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चात मदत व्हावी यासाठी दरमहा १००रुपये (दहा महिन्यासाठी) अनुदान म्हणून वर्षाला ५००असे एकुन १५००रुपये दिले जाणार.
या योजनेचा लाभ ओबीसी विद्यार्थ्यांना अजुनही मिळाला नाही. दोन वर्षाचा कालावधी होऊनसुद्धा एकही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ मिळु शकला नाही. समाजकल्याण विभागाचे ढिसाळ नियोजन चव्हाट्यावर आले आहे. तात्काळ ओबीसी विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ चिमुर चे कवडू लोहकरे यांनी केली आहे.
“” सन २०१९च्या शैक्षणिक सत्रात १ली ते १०वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पैसे खर्च करून बँक खाते काढली, कागदपत्रे गोळा केली, पैसा व वेळ खर्च करुनही विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे ओबीसी पालकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. “”
कवडू लोहकरे
कोषाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ चिमुर