ताज्या घडामोडी

चंद्रपूर मनपाची सुंदर माझे उद्यान -ओपन स्पेस स्पर्धा

योग नृत्य परिवारचा स्पर्धेत सहभाग! रंज्जू मोडक यांची टीम उतरली स्पर्धेसाठी मैदानात

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

गत वर्षी प्रमाणे या वर्षी देखील चंद्रपूर महानगरपालिकाच्या वतीने सुंदर माझे उद्यान -ओपन स्पेस ही स्पर्धा घेण्यात येत आहे.दरम्यान होवू घातलेल्या या स्पर्धेत शहरातील 60 पेक्षा अधिक संघ सहभागी झाले आहेत.या स्पर्धेच्या निमित्ताने सदैव जनसेवेसाठी तत्पर असलेल्या शहरातील ” योग नृत्य” या सुपरिचित संस्थेने पुढे येऊन शहरातील एकूण 11 जागेंची स्वच्छता करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. स्थानिक सिध्दीविनायक मंदिर चवरे लेआऊट ,गुरूद्वाराच्या मागे एक मंदिर आहे. परंतु सद्यस्थितीत त्या ठिकाणची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे उगवली असून तेथे साप व विंचूचे प्रमाण देखील वाढले असल्याचे दृष्टीक्षेपात पडते दररोज लोक त्या मंदिरात दर्शनाला येतात. उपरोक्त परिसरात अद्याप साफसफाई झाली नाही. दरम्यान तो परिसर सर्वांगिण सुंदर व सुरेख बनावा अशी महानगर पालिका आणि चंद्रपूर शहरातील योग नृत्य परीवारची अपेक्षा आहे. त्याच अनुषंगाने योग नृत्य परिवारचे जनक गोपाल मुंदडा यांच्या मार्गदर्शनात व चंद्रपूरातील सामाजिक कार्यात सदैव मोलाचे योगदान देणाऱ्या रंजु मोडक यांच्या नेतृत्वात त्यांच्या संपूर्ण टीमने सिध्दीविनायक मंदिर परिसरात गेल्या २३ जूलै पासून नियमित स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.त्यांच्या या कार्यात स्थानिक जनतेचा देखिल उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे टीम प्रमुख रंज्जू मोडक यांनी एका भेटी दरम्यान या प्रतिनिधीस आज सांगितले.
गोपाल मुंदडा हे नित्य संपूर्ण टीमला मोलाचे मार्गदर्शन करीत असल्याचे रंज्जू मोडक बोलताना म्हणाल्या.श्रमदान करून मंदिर परिसर स्वच्छ करण्यासाठी ही टीम सध्या कार्यरत झाली असल्याचे दिसून आले. रंजु मोडक यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण टीम एक महिना श्रमदान करून सिध्दीविनायक मंदिर स्वच्छ व सुंदर बनविणार आहे.गत वर्षी देखिल रंज्जू मोडक यांच्या सह त्यांच्या टीमने या उपक्रमात पुढाकार घेत उल्लेखनीय कामगिरीचा पुरस्कार मिळविला होता. हे सर्वश्रुतच आहे.सध्या त्यांच्या या कार्यात त्यांना रेनुका काळे , भालचंद्र काळे , भावना टोटे , वैशाली टोटे , अनिता काळे , शरदचंद्र नागोसे, पंचफुला चिडे , लीलाबाई काळे , नारायण मोरे ,राधिका कुळकर्णी, कविता घुमे ,सुगंधा गौरकार, अविनाश दोनाडकर,शिशिर काटे आदींचे मोलाचे सहकार्य लाभत असून गोपाल मुंदडा हे या टीमला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करीत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close