ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असलेले फॅमिली आय डी चे काम बंद करा
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे
ग्रामपंचायत कार्यालय शंकरपूर अंतर्गत सुरु असलेले फॅमिली आय डी चे कार्य त्वरित बंद करण्यात यावे,या आय डी करिता ग्रामपंचायत शंकरपूर चे कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबातील संपूर्ण व्यक्तीचे आधार कार्ड नंबर,जॉब कार्ड नंबर आणि पासपोर्ट फोटो मागत आहेत. नागरिकांनी विरोध दर्शविला असता सदर कर्मचारी ग्रामविकास अधिकारी शंकरपूर यांचे पत्र दाखवितो.
आधारकार्ड हे नागरिकांच्या बँक खाते, गॅस कनेक्शन व ईतर शासकीय व निमशासकीय कार्यकरिता लिंक केलेले आहे त्यामुळे गोपनीय माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मा. संवर्ग विकास अधिकारी चिमूर यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता शासकीय स्तरावर फॅमिली आय डी बनविण्यासंदर्भात कुठलेही पत्रक शासन स्तरावरून नाही असे सांगितले तरी सदर फॅमिली आय डी चे कार्य त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी शंकरपूरचे कर्तव्यदक्ष नागरिक शैलेश गायकवाड,नारायण चौधरी, येशवकला ढोक,शारदा गायकवाड, गोकुल सावरकर यांनी सरपंच/सचिव ग्रामपंचायत कार्यालय शंकरपूर यांना निवेदनाद्वारे केली आहे.