मोठ्या यशा मागे कठीण संघर्षाची पार्श्वभूमी असते-देशमुख

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी:-दे रे हरी खाटल्या वरी असे कधी होत नसते.बघू,करू,आपल्याला जमेल काय? या पेक्षा “करून बघू” म्हणत, कुठल्या ही क्षेत्रात जे यशस्वी होत असतात, त्या मागे ध्येय निश्चित करून केलेले प्रामाणिक प्रयत्न, जिवतोड मेहनतीचा संघर्ष असतो. असे मत योगेश्वरी शुगर्स चे कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख यांनी या साखर कारखान्यातील कर्मचारी यांच्या दोन पाल्यानी वैद्यकीय पुर्व परिक्षा “नीट” आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मिळवलेल्या घवघवित यशा बद्दल सत्कार समयी बोलतांना व्यक्त केले.

या वेळी मुख्य शेतकी अधिकारी देविदास मोकाशे,प्रशासकीय अधिकारी राजकुमारसिंह तौर,मुख्य अभियंता अनंत बावने,मुख्य लेखापाल मुकेश रोडगे,भांडारपाल,सोमनाथ सावंत,सुरक्षाधिकारी नामदेव हारकाळ,वसुली अधिकारी संजय महाजन,मोहन देशमुख,मुख्य वाणिज्याधिकारी माणिकराव डोंबे,वरीष्ठ रोखपालसुरेश गिराम,वरीष्ठ लिपिक सोमेश्वर सिताफळे,कल्याणराव फपाळ यांची उपस्थिती होती.
विटा बु. येथील ऊस बागायतदार तथा योगेश्वरी शुगर्स मध्ये कर्मचारी असलेले उमर शेख यांची मुलगी कु.आयशा शेख हिने वैद्यकीय पुर्व परिक्षेत “नीट” घवघवित यश संपादन करून एमबीबीएस प्रवेशा साठी पात्रता मिळवली तर मुलगा सद्दाम शेख याने अभियांत्रिकीची पदवी मिळवल्या नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवल्या च्या दुहेरी यशा बद्दल कर्मचारी उमर शेख यांच्या सह त्यांच्या दोन्ही पाल्यांचा सन्मान योगेश्वरी शुगर्स परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी पुढे बोलतांना अॅड देशमुख म्हणाले की,जी कुटूंबे संघर्षशिल असतात त्याच कटूंबातील पाल्य हे संघर्ष करून मोठे यश प्राप्त करत असतात.
अशा यशस्वी विद्यार्थ्यांची प्रेरणा इतरांनी घेण्याचे आवाहन करत या कारखान्याशी संबंधित सर्व घटक हे यशस्वी होत असल्याचे मनस्वी समाधान वाटते. तसेच खेड्यातील ही मुले यश संपादन करत असल्याचा अभिमान ही वाटत असल्याचे सांगून भविष्यात अशा संघर्षशिल पाल्यांच्या यशा साठी कारखाना प्रशासनाच्या माध्यमातून चेअरमन आर टी जिजा देशमुख यांच्या मार्गदर्शनात काम करण्याचा माणस असल्याचे ही ते म्हणाले.
शेख उमर यांच्या प्रामाणिक कष्टाचे कौतुक करत त्यांनी स्वत: प्रामाणिक काम करत पाल्यांना दिलेले बळ आणि संस्कार हे कुठलीही संपत्ती कमावण्या पेक्षा संस्कारक्षम संतती घडवल्याचे उदाहरण असल्याचे सांगत कौतुक केले.
या कार्यक्रमा साठी मोठ्या संखेने अधिकारी, कर्मचारी, कामगार यांची उपस्थिती होती.