ताज्या घडामोडी
चिमुर पब्लिक स्कुल येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
नुकताच चिमूर पब्लिक स्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला चिमूर नगराध्यक्षा सौ गीताताई बाबा लिंगायत कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सौ. कांचन संजय खाटिक या उपस्थित होत्या कार्यक्रमांमध्ये नर्सरी, kgI, KGII मधील मुलानी खूप सुरेख नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सौ.गीताताई लिंगायत मॅडमनी मुलांचे कौतुक केले.आणि सर्व यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.इंदूरकर मॅडम यांना दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या संस्थापिका आणि मुख्याध्यापिका सौ संध्या इंदूरकर,आणि संचालन सौ.रविना वाघ मॅडम यांनी केले आणि आभार प्रदर्शन सौ.संध्या इंदूरकर मॅडम यांनी केले.कार्यक्रमाला सर्व पालकवर्ग प्रेक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.









