ताज्या घडामोडी

दिव्यांगांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

ज्ञानार्चना अपंग स्नेह बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर ही संस्था नेहमीच संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर समाजकार्य करीत असते. मुख्य म्हणजे दिव्यांग व्यक्ति समाजात सुरळीत जीवन कसे जगतील यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. आणि त्याचाच एक भाग म्हणून दिव्यांगांकरीता व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेद्वारे २०१८ पासून दिव्यांगांसाठी निवासी व्यवस्था असलेल्या दिव्यांग महिलाश्रयातील दिव्यांग महिलांचे मनोबल वाढावे हा नेहमीच प्रयत्न ही संस्था करीत असते. या शिबिरामध्ये दिव्यांगांचा आत्मविश्वास कसा वाढेल, आपण प्रेक्षकांसमोर कसे बोलावे या बाबतीत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच अनेक खेळांचे आयोजन सुद्धा केले गेले. आणि प्रत्येक खेळांतिल विजेत्यांना आकर्षक बक्षिसे संस्थेच्या संचालिका कु. अर्चना मानलवार मैडम यांच्या हस्ते देण्यात आले. स्वतः संस्थेच्या संचालिका मा.अर्चना मानलवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले, आणि मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या वेळी दिव्यांग व्यक्ति स्व:बळावर उभे राहू शकतात. ज्याप्रमाने आदरणीय हेलन केलर आणि स्टीपन हॉकिंग हे स्वत: दिव्यांग असून सुद्धा समाजात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करू शकतात तर त्यांचा आदर्श ठेवून आपण सुद्धा स्वत: चांगले काम करू शकतो आणि आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. असे मानलवार मैडम यांनी सांगितले. कार्यक्रमाला संस्थेचे पर्यवेक्षक श्री. कुंदन स. खोब्रागडे व संस्थेतील इतर पदाधिकारी आणि दिव्यांग महिलाश्रयातील सर्व दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close