ताज्या घडामोडी

रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक घोबाळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह रासप मध्ये प्रवेश

  • आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे खंबीर समर्थक व रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ घोबाळे यांचा आपल्या कार्यकर्त्यांसह आज दि. १६ ऑक्टोबर २०२१ शनिवार रोजी आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रीय समाज पक्षत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत संपर्क कार्यालय राम-सीता सदन गंगाखेड येथे प्रवेश केला.
यावेळी अशोकभाऊ घोबाळे यांच्यासह महावीर घोबाळे,लिंबाजी घोबाळे, निखिल कांबळे,रुपेश व्हावळे,अनिल कांबळे, सोनू घोबाळे,अनिल गायकवाड,करण मुंडे, शुभम घोबाळे,प्रवीण मुरकुटे,आकाश डहाळे, धम्मा तायडे,ऋषिकेश पारवे,शिवा लहाने,गणेश व्हावळे,करण डमरे,नागेश शेवाळे,शुभम राठोड,विकी जाधव,वैभव कुरुडे,सौरव देवळे,करण मुंडे,शुभम लटपटे,किशोर जाधव, अमोल भालेराव,नितीन रोडे,शंभूदेव नागरगोजे लिंबाजी बचाटे इतर अनेकांनी पक्ष प्रवेश घेतला. पक्ष प्रवेश झाल्यानंतर सर्वांना शुभेच्छा देत मी आमदार या नात्याने विकासासाठी सदैव तुमच्या पाठीशी आहे असा शब्द आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी दिला.
पक्ष प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे यावेळी उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष संदीप अळनुरे, प्रभारी हनुमंत मुंडे,तालुका अध्यक्ष शिवाजी पवार, नगरसेवक सत्यपाल साळवे,शहराध्यक्ष खालिद भाई,सतीशभाऊ घोबाळे, राजू अहमद खान,हरिभाऊ घोबाळे,इंतेसार सिद्दिकी, संजय पारवे,महेशआप्पा शेटे इत्यादींनी ही अभिनंदन केले. येणाऱ्या काही दिवसात नगरपालिकेच्या निवडणुका येत असल्याने विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close