ताज्या घडामोडी

आनंद निकेतन महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

आनंद निकेतन महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सफल हॉस्पिटल, नागपूर येथील डॉ.पॉलमी डे (Ms. FIRM,MRCOG I) तसेच डॉ. पल्लवी वरुन झाडे (B.P.Th, M.P. Th , PG Dip in Garbh sanskar) त्यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
तसेच कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे सर यांनी अध्यक्षीय भाषण केले .
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राधा सवाने यांनी महिला सक्ष्मीकरणावर जोर देत आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरवात डॉ. रंजना लाड यांचा प्रस्ताविकाने झाली.
तसेच प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. Dr. संयोगीता वर्मा यांनी पाहुण्याचे परिचय करून देत आपले मनोगत व्यक्त केले .
डॉ. पॉलमी डे यांनी मासीक पाळी व स्रीरोग विषयक समस्या याबाबत विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व डॉं. पल्लवी झाडे यांनी स्त्रीयांनी आरोग्यसंपन्न राहण्याकरिता करावयाचे योग व व्यायाम या बद्दल मार्गदर्शन केले व संवाद साधला.
त्यासोबतच आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले .
यास विध्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमास 164 विध्यार्थी उपस्थित होते.
त्यापैंकी 53 विध्यार्थ्यांनी तपासणी करून घेतली.कार्यक्रमाचे संचालन Msc 2nd yr zoology ची विध्यार्थीनी कु. किरण मेश्राम हिने केले. तसेच आभार प्रदर्शन Msc 2nd yr zoology ची विध्यार्थीनी कु.योगिनी लोणकर हिनी केले .अशाप्रकारे आंतराष्ट्रीय महिला दिन आनंद निकेतन महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close