रेणाखळीकरांचे पिण्याच्या पाण्याचे स्वप्न होणार साकार
जलजीवन मिशन अंतर्गत कामाला सुरुवात .
घरोघर मिळणार फिल्टर युक्त पाणी .
सरपंच राहुल ब्रम्हराक्षे यांच्या प्रयत्नाला यश .
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील रेणाखळी हे गाव चार हजार लोकसंख्येचे असुन पिण्याच्या शुध्द पाण्यापासून वंचित होते प्रत्येक घरी आपआपल्या शेतातील विहिरीतुन शेंदुन पाणी आणावे लागत होते,गावाशेजारून जायकवाडी धरणाचा डावा कालव्याच्या पाण्यावर सर्व विहीरी अवलंबून आहेत दुष्काळ पडला अथवा कालव्यास पाणी नसल्यास गावातील सर्व विहीरी कोरड्या पडतात अशा वेळी गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो ह्या विषयी गावकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी केली ह्या विषयी रेणाखळीकरांची समस्या मांडली होती. गावकऱ्यांच्या मागणीला व सरपंच राहुल ब्रम्हराक्षे व ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असुन शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत चार कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.रेणाखळी गावचे सरपंच राहुल ब्रम्हराक्षे यांच्या सततच्या प्रयत्नानेही योजना मंजूर झाली असून जेष्ठ नागरिक व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुक्तीराम हारकळ यांच्या हस्ते नारळ फोडुन गावातील पाइपलाइन खोदकामाचे उद्घाटन करण्यात आले. ढालेगाव बंधाऱ्याखाली असलेल्या रत्नेश्वर रामपुरी येथे स्वतंत्र विहीर खोदुन रामपुरी ते रेणाखळी लोखंडी पाईपलाईन द्वारे रेणाखळी येथे वॉटर ट्रीटमेंट प्लांट व दोन लाख वीस हजार लिटर क्षमतेची पाण्याची नवीन टाकी बांधून रेणाखळीकरांना प्रत्येक गल्लोगल्ली एचडी पी ई पाइपलाइन करून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे . देशाच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत रेनाखळीकर पाण्यापासून वंचित होते,
खुप दिवसांनी असलेली रेणाखळीकरांची पिण्याच्या पाण्याची सोय होणार असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे
पाइपलाइन खोदकामाचे उद्घाटन करतेवेळी रेणाखळी गावचे माजी सरपंच उद्धवराव श्रावणे , दादाराव हारकळ, ग्रामपंचायत सदस्य शे.अलिमोददीन , रमेश इंगळे, बाबासाहेब हारकळ,शे.इमरोज शे.निसार व गावातील तरुण विष्णू हारकळ,अमोल इंगळे शालेय व्यवस्थापन समितीचे उध्दव इंगळे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .