ताज्या घडामोडी

सुगंधित तंबाकूची विक्री करणाऱ्यांवर चिमूर पोलिसांची धाड

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

चिमूर तालुक्यात तंबाकू शौकीन वाढत असल्याने अनेक दुकानदारांनी प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू विकण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. यापैकी नेरी येथील एका दुकानदारावर कारवाई करीत त्याच्याकडून माल जप्त करण्यात आला. ही कारवाई ०५/नोव्हेंबर २०२१ रोजी नेरी परिसरात करण्यात आली.रमेश गंगाधर बानकर यांचे होलसेल किराणा दुकान असून यांचे घरातून प्रतिबंध सुगंधित तंबाकू रुपये ७४,६०० चा माल जप्त करण्यात आला. तसेच दुसऱ्या कारवाईत खुटाळा येथील पंढरी किसन सुरकर यांचे दुकानात धाड टाकली असता.४०,०००/ सुगंधित प्रतिबंध तंबाकू मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीना ताब्यात घेतले असता. चिमूर चे अप्पर पोलीस निरीक्षक अतुल कुलकर्णी, सहायक पोलीस अधिक्षक नोपाणी, बाळासाहेब खाडे, चिमूर पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक मंगेश मोहड पुढील तपास करीत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close