नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटी रेबीज वॅक्सिं त्वरित उपलब्ध करावी__डॉ. श्यामजी हटवादे
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
नेरी गावात कालपासून सकाळी पाच वाजता गोपाळा बानकर यांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला त्यानंतर रात्रीचे आठ वाजेपर्यंत बारा ते तेरा लोकांना त्याच कुत्र्यांनी चावा घेतला त्यामुळे नेरी गावात कुत्र्याच्या चावण्याची दहशत पसरली असून त्या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा ही मागणी जोर धरत असून नागरिकांनी ग्रामपंचायतला तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण गेल्यानंतर लस उपलब्ध नाही तुम्ही चिमूरला जा असे सांगण्यात येत आहे परंतु चिमूर ला सुद्धा ग्रामीण रुग्णालयामध्ये लस उपलब्ध नाही त्यामुळे चिमूर हे तालुक्यातीलच कुत्रा चावलेल्या रुग्णांना नाहक त्रास होत आहे म्हणून तातडीची उपाययोजना म्हणून अँटी रेबीज वॅक्सिंग उपलब्ध करून रुग्णांना त्वरित दिलासा द्यावा अशी मागणी जेष्ठ कार्यकर्ता तसेच विशेष निमंत्रित भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉक्टर श्यामजी हटवादे आणि नेरी परिसरातील समस्त जनतेने केलेली आहे.