ताज्या घडामोडी

शाँट सर्किटमुळे घर जळाले मात्र जिवीतहानी टळली

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

अहेरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत राजपूर पँच मधील मुख्य चौकातील पीठ गिरणी चे व्यापारी श्री भास्कर बोडगेलवार यांच्या घराला गुरुवार १सप्टेंबर २०२१ रोजी मध्यरात्री च्या सुमारास शाँट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. यामध्ये घरात असलेले आवश्यक कागदपत्रे तसेच स्वमालकीच्या घरगुती वापरासाठी असलेली फ्रीज व अन्य जिवन आवश्यक वस्तू आगीत जळून खाक झाले असून यात त्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बोडगेलवार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात गेले होते.मात्र मध्यरात्री च्या सुमारास शाँट सर्किटमुळे घरात आग लागल्याने घरातून धूर निघत असल्याने आग लागल्याचे राजू गोट्टमवार यांच्या लक्षात आले.गोट्टमवार यांनी आरडाओरड केले विशेष म्हणजे अहेरी पोलीस स्टेशन चे महिला पोलिस उपनिरीक्षक आरती नरोटे यांनी आपल्या चमू सह या परीसरात दुचाकी चोरट्यांची धुमाकूळ असल्याने बोरी येथे मध्यरात्री च्या सुमारास पेट्रोलियम करीता आले असता नागरीकांचा आरडाओरडा बघून घटनास्थळी धाव घेतले सदर ठिकाणी पोहचताच घराला आग लागल्याचे लक्षात येताच पोलिस कर्मचाऱ्यांनी घराचा दार तोडून आत प्रवेश केला व ग्रामपंचायत राजपूर पँच च्या हातपंप ने व इतर साधनाने आग आटोक्यात आणले मात्र यात त्यांचा घरात असलेले आवश्यक कागदपत्रे व घरगुती वापरासाठी असलेली फ्रीज व अन्य जिवन आवश्यक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडले मात्र यात जिवीतहानी टळली.आग आटोक्यात आणण्यासाठी अहेरी पोलीस स्टेशन चे महिला पोलिस उपनिरीक्षक आरती नरोटे,ना.पो.शी.प्रशांत हेडावू,दिपक कत्रोजवार, हवालदार बांबोळे,पो.शी.दिपा आत्राम, ग्रामपंचायत राजपूर पँच चे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सुरेश गंगाधरीवार संगणक परिचालक विनोद सदनपवार,नितीन गुंडावार अमीत बोमकंटीवार व गावातील अन्य नागरीकांनी सहकार्य केले.या आगीमध्ये बोडगेलवार कुटुंबीयांचे सर्वस्व जळून खाक झाल्याने त्यांच्या परिवारात मोठे संकट कोसळले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close