पोलीस मिञ परिवार समन्वय समिती अमरावती पदधिकाऱ्यांची सदाशांती बालगृह,अनाथ आश्रम मध्ये दिवाळी साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पोलीस मिञ परिवार समन्वय समिती सतत पोलीस विभाग व सामाजिक स्तरावर सर्व सामान्य नागिरिकांची दखल घेऊन समितीचे संस्थापक/अध्यक्ष मा.डॉ.संघपाल उमरे यांच्या आदेशाप्रमाणे, मा.सुभाषजी सोंळके महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार,मा.मनिष गुडधे अमरावती विभागिय प्रमुख,मा.कैलाशजी विंचुरकर अमरावती जिल्हा अध्यक्ष,मा.राजेंन्द्रजी तांबेकर,मा.कुंदन गजभिये भातकुली तालुका अध्यक्ष,मा.वैभव पंराजपे अमरावती पदधिकारी,मा.सोंळके मॅडम,मा.सम्यक उमरे,विदर्भ युवा सचिव,मा.राजेंन्द्र राऊत, शिवानसिंह सोंळके छोटे पोलीस मिञ व सर्व अमरावती विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत सदाशांती बालगृह,अनाथ आश्रम चिलम छावनी येथे आई-वडिल नसलेल्या,व सोडुन दिलेल्या मुलीं सोबत फराळ देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.

याप्रसंगी समितीचे संस्थापक/अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार यांनी मा.सुधिरजी इंगळे व्यवस्थापक सदाशांती बालगृह अनाथ आश्रम चिलम छावनी यांचेशी आश्रमातील आढाव व महत्वपूर्ण माहिती घेऊन आश्रमाबाबत सखोल चर्चा केली व पुढे सहकार्य व मदत करण्यासाठी पोलीस मिञ परिवार समन्वय समिती चे पदधिकारी नेहमी तयार असतील असी माहिती दिली.