ताज्या घडामोडी

नेरी येथे सार्वजनिक वाचनालय उद्घाटन संपन्न

ग्रामपंचायत नेरीचा स्तुत्य उपक्रम

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या शुभहस्ते उद्घाटन

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

लोकांत वाचनाची आवड निर्माण व्हावी. जगभरातील घडामोडी बाबत माहिती मिळून ज्ञानात भर पडावी या उद्देशाने नेरी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. चिमुर विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार किर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांचे शुभहस्ते हे उद्घाटन आज दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी करण्यात आले. ग्रामपंचायत नेरीच्या वतीने वाचनालय सुरु करण्यात आले. वाचनालय हे एकमेव असे भंडार आहे ज्या ठिकाणी जगातील सर्व ज्ञानाचे पूर्ती केली जाते. वाचनालयामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती काही ना काही ज्ञान घेऊन बाहेर जातो. वाचनालयातून केवळ ज्ञानच न देता एक सुसंस्कृत ज्ञान दिले जाते. आज एकविसाव्या शतकात गाव तिथं वाचनालय हे आता मान्य झाले आहे. काही गावात शासनाच्या वतीने वाचनालय सुरू होतात तर काही ठिकाणी सामाजिक संस्था पुढे येऊन वाचनालय सुरु करतात. वाचनालये गावचे सांस्कृतिक केंद्र बनते. गावात वाचनालय सुरु झाले की गावातील लोकांना वाचनाची आवड निर्माण होते. आपला रिकामा वेळ गावकऱ्यांनी वाचनालयात घालवता आला पाहिजे त्यामुळे अनेक रिकामटेकड्या विध्वंसक गोष्टींना आळा बसतो. घर कामात गुंतलेल्या गृहिनी वेळात वेळ काढून वाचनालयात जातात आणि चांगली पुस्तके वाचतात त्यामुळे वाचकांची आणि ओघाने गावाचे ज्ञानाची कक्षा उंचावत जाते. आजच्या काळाला वाचनालयाची खूप आवश्यकता आहे कारण आजची आधुनिक पिढी हे वाचनालय आणि ग्रंथालय यासारख्या गोष्टींना विसरत चालली आहे. दररोज हजारो पुस्तके प्रकाशित होतात. ही पुस्तके प्रत्येक व्यक्तींना खरेदी करणे सोपे नाही. ज्या व्यक्ती ना वाचनाची आवड आहे आणि ज्याच्याजवळ पुस्तके खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत अशा व्यक्तींसाठी वाचनालय खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. जगातील सर्व साहित्य, कला, विज्ञान, तर्कशास्त्र आणि धोरण इत्यादी ज्ञानाचे अपार भांडार आपल्याला एकाच ठिकाणी वाचनालयात मिळते. तसेच नेरी येथील विद्यार्थी गावांमध्ये वाचनालय नसल्यामुळे चिमूर येथे अभ्यास करण्यासाठी जाऊन आपला वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च करत होते तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती जाण्या-येण्याची नव्हती त्यांनी घरीच अभ्यास केला. आज च्या युगामध्ये स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी युवक व युवतींना वाचनालयाची खूप आवश्यकता नेरी मध्ये भासत होती ही अडचण ग्रामपंचायत सर्व सदस्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी एकमताने ठराव घेऊन नेरी मध्ये सर्वांसाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सार्वजनिक वाचनालय ची निर्मिती केली. या वाचनालयाची उद्घाटन करते वेळी रेखा पिसे ( ग्रामपंचायत सरपंच), चंद्रभान कामडी(उपसरपंच), धवणे(ग्राम विकास अधिकारी), सर्व ग्रामपंचायत सदस्य, संजय डोंगरे, डॉक्टर श्यामजी हटवादे, प्राध्यापक राम राऊत, माया नन्नावरे, राजू पाटील झाडे, मनीष तुम्पल्लीवार, मनोज मामिडवार(जिल्हा परिषद सदस्य), कमलाकर लोणकर, कन्हैयासिंग भौंड, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close