पालम शहर मार्ग हिंगोली,अकोला,वसमत,औंढा नागनाथ एसटी बस सुरू करण्यासाठी एम.आय.एम पालमचा पाठपुरावा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे पालम तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी परभणी यांना व राज्याचे मुख्यमंत्री बालासाहेब ठाकरे यांना निवेदन सादर करून पालम शहरातील 249,235 या दोन राज्य महामार्गावरून पालम शहरातून पुर्णा मार्ग हिंगोली,अकोला,वाशीम,वसमत,औंढा नागनाथ,परळी वैजनाथ,कळमनुरी आदी ठिकाणी
एसटी बस सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
स्वीस्तर वृत्त असे की पालम हा शहर परभणी जिल्ह्यातील एक इतिहासीक तालुका असुन पालम शहरातून हिंगोली जिल्ह्यसाठी पुर्णा मार्ग बससेवा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू झालेली नाही.पालम ते हिंगोली, अकोला,लातुर शहराला जोडण्यासाठी व तसेच देशाची राजधानी दिल्ली शहरासाठी पालम शहरातून दोन राज्यमहामार्ग आहे.1) राज्यमहामार्ग क्रमांक 235 पालम ते परभणी, 2) राज्यमहामार्ग क्रमांक 249 लातुर-किनगाव-राणीसावरगाव-पालम-शेखराजुर-पुर्णा मार्ग हिंगोली या दोन्ही महामार्गावरून पालम,पुर्णा मार्ग हिंगोली अकोला जिल्ह्यासाठी कोणत्याही एसटी आगाराची बस सुरू केलेली नाही.भोगोलीयदुष्टा पाहिल्यास पालम हे शहर चार जिल्ह्यांच्या सिमा वर असुन चारही जिल्ह्यांच्या जिल्ह्याचे ठिकाण सुध्दा जवळे आहे.येथुन मोठ्या प्रमाणावर प्रवासीयांची संख्या आहे.व पुर्णा शहरात रेल्वेचे जंक्शन असल्याने पुर्णा व हिंगोली शहरासाठी पालम येथुन मोठ्या प्रमाणात प्रवासाची संख्या असल्याने एसटी महामंडळाच्या उत्तपन्नात वाढ होउन महाराष्ट्र सरकारचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार आहे.
पालम ते पुर्णा मार्ग हिंगोली,अकोला वसमत,औंढानागनाथ,जिंतुर,पाथरी,सेलु,मानवत आदी ठिकाणी लाम पल्ल्याच्या बससेवा सुरू करण्यात याव्यात अशी रास्त मागणी A.I.M.I.M पक्षाच्या पालम शाखेच्यावतीने करण्यात आली आहे. तातडीने दखल घेण्यात आली नाही तर लोकशाही मार्गाने पालम तहसील कार्यालय परिसरात उपोषण करण्याचा इशारा एम.आय.एमचे पालम तालुका प्रभारी अध्यक्ष अनीस भाई खुरेशी यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना दिला आहे.