नेरी येथे कविवर्य कुसुमाग्रज जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन व निमंत्रितांचे कवी संमेलन संपन्न
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
कविवर्य कुसुमाग्रज जयंती दिनाचे औचित्य साधून नेरी येथील कवियत्री सौ.सविता प्रभाकर पिसे (झाडे मॅडम) यांनी झाडीबोली साहित्य मंडळ व उपक्रमशील शिक्षिका हॅलो सखी समूह नेरी- चिमूर जिल्हा चंद्रपूर यांच्या सहयोगाने सरस्वती कन्या विद्यालय नेरी येथे मराठी राजभाषा दिन व निमंत्रितांचे कवी संमेलन या बहारदार उपक्रमाचे आयोजन केले.
मराठी राजभाषा दिन समारोहाला अध्यक्ष म्हणून माननीय डॉ. सुमंगला मनोहरराव साखरकर सेवानिवृत्त प्राचार्य जनता विद्यालय नेरी भाष्यकार मा. प्रा. राम राऊत सर सेवानिवृत्त प्राचार्य जनता कनिष्ठ महाविद्यालय नेरी .विशेष अतिथी माननीय डॉ.अश्विनी कुशाबराव रोकडे राष्ट्रीय विद्यालय चिमूर. संमेलनाध्यक्ष श्री नेतराम इंगळकर कवी/ गझलकार. प्रमुख अतिथी संध्या बोकारे कवयित्री.इ.उपस्थित होते.
मी आज माझ्या कुटूंबीयात आले असा भाव व्यक्त करत कार्यक्रमाच्या सन्मानीय अध्यक्षा सूमंगला साखरकर यांनी उपस्थितांच्या हृदयाला स्पर्श करीत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवा असा स्पष्ट विचारांचा वेध त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून घेतला.
आपल्या ओघवत्या वाणीतून माय मराठीची गोडी भरत असतानाच सर्व श्रोत्यांना एकाच भावनिक धाग्यात बांधून घेत प्राध्यापक राम राऊत सर यांनी अनेक थोर मान्यवर लेखक कवी मंडळीच्या साहित्याचा आशय घेत नवोदित लेखक कवी मंडळींनी अधिक वाचन करीत आपले साहित्य उत्कृष्ट निर्माण करावे आणि नवीन समाज घडविण्यात आपला मोलाचा सहभाग द्यावा. असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून सर्वांना दिला.
विशेष अतिथीतीय विचार व्यक्त करत डॉक्टर अश्विनी रोकडे यांनी मानवाच्या व्यक्त होण्यातील भाषेच्या उत्पत्ती आणि निर्मितीची कारणमीमांसा अतिशय उत्तम रित्या व्यक्त केली शरीर अवयवांचा देखील भाषा समृद्धी मध्ये किती महत्त्वपूर्ण योगदान असतो हे आपल्या उत्कृष्ट भाषा शैलीतून त्यांनी विशद केले तर दुसऱ्या सत्रातील निमंत्रितांचे कवी संमेलन अध्यक्ष म्हणून लाभलेले कवी व गझलकार श्री नेतरामजी इंगळकर यांनी कविता निर्मिती म्हणजे म्हणजे ओजड भाषा नसून साध्या शब्दातून व्यक्त होणारी भावना होय .जी आपल्या हृदयाला थेट भिडते. तर ट ला ट न जोडता आपल्या कवितेतील शब्दांना तासून त्यावर संस्कार करूनच कविता निर्मिती करावी असा मोलाचा संदेश आपल्या भाषणातून दिला तर प्रमुख अतिथी म्हणून संध्या बोकारे यांनी काव्य प्रवासातील सौंदर्यवादी भूमिका विशद करत तेजाने तेज वाढवावे असा मौलिक संदेश दिला.
पहिल्या सत्राचे बहारदार सूत्रसंचालन कवी श्री संतोष मेश्राम (ताटवाकार) यांनी केले तर दुसऱ्या सत्रातील कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवयित्री कु. रजनी गेडाम यांनी केले उपस्थित सर्व पाहुण्यांचे कवी ,कवयित्री व रसिक श्रोत्यांचे आभार सौ नंदा खानोरकर यांनी मानले .
कविसंमेलनात श्री शंकर सोनवाने बेनीराम ब्राह्मणकर रवींद्र उरकुडे अनिकेत गुरनुले जयपाल श्रीरामे संतोष मेश्राम वर्षा शेंडे संध्या बोकारे नंदा खानोरकर प्रभाकर पा. पिसे ,रजनी गेडाम सविता झाडे पिसे ,संजय पंधरे अशा एकूण 15 कवींनी आपल्या कवितांचे दर्जेदार सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन श्री संजय सखाराम पंधरे साधन व्यक्ती पंचायत समितीची चिमूर ,श्री प्रभाकर काशिनाथ पिसे पदवीधर शिक्षक खुटाळा यांनी केले असून कार्यक्रमात मोलाचा सहभाग असणाऱ्या सरस्वती कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सौ.अर्चना डोंगरे मॅडम व शिक्षक शेंडे सर आणि कार्यक्रमाला उपस्थित अखिल शिक्षक संघसैनिकांचेही विशेष आभार आयोजिका सौ सविता पिसे (झाडे) यांनी मानले.