ताज्या घडामोडी

झट पट श्रीमंत बनन्याच्या नादात शेकडो नागरिकांना चुना लावत ९० लाख रुपयांचा घोटाळा आला पुढे

भांदवी ४२० अंतर्गत गुन्हा दाखल,गुन्ह्यांचे स्वरूप वाढणार!

शेतकरी बचत गट तयार करून केला,”वनधन-जनधन,योजने च्या माध्यमातून गोरखधंदा

तालुका प्रतिनिधी: मंगेश शेंडे चिमूर

चिमूर येथील प्रभाकर सातपैसे यांनी शेतकरी बचत गट तयार केले व या शेतकरी गटाच्या माध्यमातून,”वनधन व जनधन,योजनांतर्गत लाखो सदस्य तयार केले व या सदस्यांना ३० ते ४० टक्के सवलतीच्या दरात सर्व प्रकारच्या वस्तू घरपोच पोहोचवण्याचे प्रलोभने दिले.या प्रलोभनांना बळी ठरत अनेकांनी सदस्यांच्या माध्यमातून करोडो रुपयांची गुंतवणूक केली.गुंतवणूक केल्यानंतर सुध्दा वेळेत माल किंवा साहित्य मिळत नसल्याने एजंट परेशान व्हायचे.

चिमूरचे राकेश वरबटकर वय ४१,हे सुद्धा प्रभाकर सातपैसे यांच्या आर्थिक गैर व्यवहाराने परेशान झाले होते.वाट बघून किती बघायची?हा घोळ त्यांच्या मनात कहर करीत होता.सेवटी त्यांनी प्रभाकर सातपैसे यांच्या विरोधात चिमूर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली व त्यांच्या तक्रारी नुसार भांदवी कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल झाला.आरोपीची कोर्टात पेशी केली असता पुढील तपासाकरीता ७ दिवसांचा पिसीआर चिमूर उच्च श्रेणी कनिष्ठ न्यायालयातील न्यायमूर्तींनी मंजूर केला आहे

प्रभाकर सातपैसे यांनी,”वनधन-जनधन, योजनांतर्गत आपले आर्थिक व्यवहाराचे जाळे चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा,नागपूर जिल्ह्यात पसरविले असून या आर्थिक जाळ्यातंर्गत करोडो रुपयांचे व्यवहार झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रभाकर सातपैसे यांच्या वनधन-जनधन योजनेला शासनाकडून कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळत नसताना,प्रत्येक मालावर व प्रत्येक वस्तूंवर ४० टक्के सवलतीची खैरात प्रभाकर सातपैसे कसा काय देत होता?या प्रश्नाने पोलिस प्रशासन चक्रावून गेले आहे.
चिमूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज गभणे यांच्या सोबत भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधला असता,त्यांनी सांगितले की,नागरिकांना नागपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार म्हणून आपला प्रसार केलेला प्रभाकर सातपैसे विरोधात अनेक लोक तक्रारी दाखल करायला येत आहेत,यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.सदर गंभीर प्रकरणाचा सखोल चौकशीद्वारे छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत,पुढील दिवसात गुन्ह्याचे स्वरूप वाढण्याची शक्यता असल्याने गुन्ह्यांच्या प्रकारातंर्गत वाढीव कलमा लावल्या जातील हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे.

पोलिस निरीक्षक मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनात चिमूर चे सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख सदर प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close