स्वच्छ सर्वेक्षण 2020 अभियानाचा उडाला फज्जा ; चिमुर परिसरात घाणीचे साम्राज्य
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
चिमूर नगर परिषद अंतर्गत चिमूर शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2020 राबविले असतांना या स्वच्छ अभियानाचा फज्जा उडाला आहे. भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रभागांमध्ये जनसंपर्क करुन समस्या जाणून घेतल्या तेव्हा कित्येक प्रभागात नाली रस्ते नसल्याने खड्यात पाणी साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही भारतीय क्रांतिकारी संघटनेने केला. काही प्रभागात सार्वजनिक कचरा पेटी उपलब्ध नाही. सार्वजनिक प्रसाधनगृहाची सोय नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी याचेंशी चर्चा करुन निवेदनाद्वारे सुचित केले असतांना सुद्धा कसल्याही प्रकारची कार्यवाही अजूनपर्यंत केलेली नाही.आवश्यक ठिकाणी सर्व प्रभागात सार्वजनिक कचरा पेटी व प्रसाधनगृहाची सोय तात्काळ करून प्रभाग 16 मध्ये सुद्धा नालीचे काम करण्यात यावे अशी मागणी भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या वतीने चिमूर तालुका संघटक कैलाश भोयर, राजू अलोने, माजी तालुका उपाध्यक्ष अरविंद अंबादे यानी केली.