खेमजई येथे सीएससी बाल विद्यालय चे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लहान मुलांना रोमांचक व ज्ञांवर्धक शिक्षण देण्याकरिता सीएससी द्वारा देशभरात बाल विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. वरोरा तालुक्यातील खेमजई येथील देवानंद महादेव तुरानकर यांच्या वतीने सीएससी बाल विद्यालयाची स्थापना खेमजई येथे करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कन्हैयालाल जयस्वाल माजी सभापती जि.प. चंद्रपुर, कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनाताई दाते माजी सदस्या पं. स.वरोरा , प्रमुख पाहुणे गुलाब राठोड सीएससी संचालक,मनीषा चौधरी सरपंच ग्रा.पं. खेमजई, विश्वनाथ तुरानकर पुलीस पाटील खेमजई, दादाजी चौधरी माजी सरपंच, खेमजई, अशोक साळवे, घनश्याम टापरे,लंकेस भेले व इतर मान्यवर उपस्थित होते. स्थानिक पातळीवर सीएससी बाल विद्यालय चे आयोजन केले आहे कार्यक्रमाचे संचालन संध्या घरत यांनी केले. तर प्रस्ताविक देवानंद तुरानकर यानी केले. आभार प्रदर्शन अनुपमा गायकवाड यानी केले आहे. याप्रसंगी ईतर मान्यवर व मुले,मूली आणि त्यांचे माता,पालक उपस्थित होते.