ताज्या घडामोडी

कनेरी /दगडी येथे मुर्ती स्थापना कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी

मौजा कनेरी /द. येथे मुर्ती स्थापना कार्यक्रमात वस्तू दान दाते आणि मुर्ती दान दाते यांचा सत्कार करतांना इंजि. मंगेश पुरणनाथ मेश्राम, सौ. मंदा पुरणनाथ मेश्राम
दि.१४ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२१ रोज मंगळवार ला मौजा कनेरी /दगडी येथे मुर्ती स्थापना कार्यक्रम सार्वजनिक हनुमान मंदिर देवस्थान कनेरी येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्तिक एकादशीच्या शुभ पर्वावर देव व संत यांच्या मुर्तीची स्थापना कार्यक्रम दि.१४/११/२०२१ रोज रविवार ला पहाटे २ वा. ह. भ. प. एनीरामजी भट महाराज यांचे हस्ते करण्यात आला.१६/११/२०२१ ला मुर्तीचे उदघाट्न व वस्तू दान दात्यांचा सत्कार, गोपालकाला, तुलसी विवाह आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला.एकनाथजी गोमासे, विजयजी डांभरे, मनोहरजी कावळे, अशोकजी बांते, श्यामसुंदर झलके, चंद्रकांत बांते, श्रीकांत नागलवाडे, लक्ष्मण बोन्द्रेकर, लक्ष्मीकांत झलके यांचा सत्कार करण्यात आला.
मुर्ती स्थापना कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजि. मंगेश पुरणनाथ मेश्राम, उदघाटक माजी जिल्हा परिषद सदस्य भंडारा उमरावजी आठोडे, विशेष अतिथी माजी पंचायत समिती सभापती लाखनी खुशालजी गिदमारे, सरपंच ग्रा. पं. कनेरी जयंत बिनझाडे, सरपंच ग्रा. पं. मांगली प्रशांत मासूरकर, घनश्याम मते, भुषण नागलवाडे, ग्रा. पं. कनेरी उपसरपंच धनंजय लांजेवार, नरहरीजी नागलवाडे, मनोहरजी कावळे, ग्रा. पं. सदस्य तुलसीदास बांते, पोलीस पाटील हर्षलजी गोमासे, तं. मु. अध्यक्ष कृष्णकमल झलके, डॉ. सुधीर झलके, कुसुमाकरजी बोन्द्रे, धनराज मेश्राम, सौ. कुंभरे ताई, सौ. मंदा पुरणनाथ मेश्राम उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close