महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या निषेधार्थ मानवत शहर कडकडीत बंद
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांची बदनामी करणारे वक्तव्य करणाऱ्यांच्या निषेधार्थ शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचाच्यावतीने शनिवारी पुकारलेल्या मानवत बदला व्यापाऱ्यांनी उस्फूर्त पाठिंबा देत मानवत शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते यामध्ये शाळा व महाविद्यालय देखील बंद होते यावेळी महापुरुषांची बदनामी करणाऱ्या जाहीर निषेध करून त्यांच्यावर तातडीने कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले महापुरुषांची बदनामी करत असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून त्वरित हटवण्यात यावे त्याचबरोबर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,सुधांश त्रिवेदी, मंगल प्रभात लोढा, प्रसाद लाड, यांच्यावर कठोर कार्यवाही करावी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेक करणाऱ्या मनोज गरबडे यांच्यावरील दाखल करण्यात आलेल्या पुण्यातील जाचक कलमे रद्द करावीत. सदरील घटनेस जबाबदार असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.ज्या चित्रपटात महापुरुषांची बदनामी करण्यात आली आहे अशा चित्रपटाच्या दिगदर्शक व निर्मात्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.महापुरुषाबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन करण्यासाठी कायदा करण्यात यावा या मागण्यांसाठी शनिवारी १७ डिसेंबर रोजी शिव फुले शाहू आंबेडकर मंचाच्यावतीने मानवत बंदची हाक हा देण्यात आली होती या बंदला व्यापाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद देत मानवत शहर कडकडीत बंद ठेवले यामध्ये शाळा,महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आले होते शनिवारी १७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता शहरातील महाराणा प्रताप चौकातून मोटर सायकलची रॅली काढण्यात आली त्यानंतर महापुरुषाच्या संदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्यांना कठोर शासन करण्यासाठी कायदा करण्यात यावा अशी मागणी महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना मानवत तहसीलदार यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी अशोकदादा पंडित न.पा.चे माजी सदस्य आनंद भदर्गे, राजकुमार खरात,श्यामभाऊ चव्हाण,अँड. विक्रम दहे,शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अनिल जाधव, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष गोविंद घांडगे, ज्ञानेश्वर चांगभले, संपत पंडित,राजेभाऊ होगे,महेंद्र ठेंगे, अमेर अन्सारी, चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, दीपक ठेंगे,बालाजी टाक, नागसेन भदर्गे, रवी पंडित, धनंजय काळे, व्यंकटेश चौधरी, दत्तराव चौधरी, नंदकिशोर कुमावत, मो. मुस्ताक मो.अक्रम शेख, हनुमान नांदुरे, छगन भदर्गे, मारुती साठे, बाळू तूपसमिंद्रे, मनसेचे उपतालुकाप्रमुख दतराव शिंदे, विलास पतंगे, संतोष सोरेकर, जनार्दन कीर्तने, बाजार समितीचे माजी संचालक तथा मराठा सेवा संघाची तालुकाध्यक्ष माधव नाणेकर,सोपानराव वाघमारे, विश्वनाथ तुरे, रामेश्वर काष्टे, विलास देशमुख, ज्ञानेश्वर पानझडे, हनुमान काळे, रवी चव्हाण, सुदाम मस्के,दीपक वाघमारे,ईश्वर घाटूळ, विश्वंभर बनसोडे, अंबादास धबडगे, उत्तम भदर्गे, नाव्ही संघटनेचे माजी अध्यक्ष दत्तराव राऊत, चंद्रकांत कनकुटे, हरि सत्वधर,चांदपाशा शेख,हरी चटाले, बापूराव कुंभकर्ण, शेख ईस्फाक,फकीरा सोनवणे, हेमंत घुगे, सटवाजी पुंड,राजेभाऊ होगे, यांच्यासह शिव,फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.