अ.भा.आदिवासी विकास परीषदेचे चिमुर तालुकाध्यक्ष ओंकार कोवे यांचा अभिनव उपक्रम
मूकबधीर विदयालयातील विदयार्थ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
प्रत्येकाला आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करणे आवडते. कुणी मित्रांना मोठी मेजवानी देतात तर कुणी आपल्या कुटुंबीयांसमवेत आपला वाढदिवस साजरा करतात. परंतु अ.भा. आदिवासी विकास परीषदेचे तालुकाध्यक्ष ओंकार कोवे यांनी सामाजिक बांधिलकी जपून अंध व मूकबधीर मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला.
त्यांनी चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मूकबधीर विदयालयातील विदयार्थ्यांना स्टेशनरी साहित्याची किट भेट देवून शिक्षणाविषयीचे आपले प्रेम व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या मित्रमंडळींसोबत विदयार्थ्यांशी हितगूज केली व त्यांच्या सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.
याप्रसंगी सुशांत भाऊ इंदुरकर ,बाळूभाऊ सातपुते , विलास मोहनकर ,गणेश वांढरे, रामसुनील दुर्गे,सूरज कुळमेथे, कृष्णा भोयर,योगेश मेश्राम,नितेश गिरोले, शुभम लोथे, मंगेश वांढरे, निलेश भूयारकर,सम्यक बंसोड,राजू बनसोड, चंद्रभागाताई, सिमा मसराम,अवी धुर्वे व अक्षय कोवे इ. मित्रमंडळी सोबत होते. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.