ताज्या घडामोडी

एकोडी सर्कल ता.साकोली सलून व्यावसायिक व नाभिक युवा मंच कार्यकारिणी गठन

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी

दि. 07/02/2022 रोज सोमवारी महाराष्ट्र नाभिक महामंडळ ता. शाखा साकोली च्या वतीने एकोडी सर्कल सलून व्यावसायिक कार्यकारिणीचे गठन करण्यास श्री संत गजानन बाबा मंदिर, एकोडी येथील सभागृहात सभा पार पडली व श्री संतांचे नामस्मरण करून नवनियुक्त कार्यकारिणीचे गठन करण्यात आले.
सदर सभेचे अध्यक्ष श्री जगदीशजी पोवनकर, म.ना.म साकोली तालुका अध्यक्ष हे असून म ना.म. विदर्भ (पूर्व) नागपूर चे विभागीय युवक अध्यक्ष श्री शरदराव उरकुडे व जेष्ठ मार्गदर्शक श्री यशवंतजी लांजेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन म.ना.म.साकोली तालुका सचिव श्री नागेश लांजेवार यांनी केले.
सदर सभेत खालील प्रमाणे ठराव घेऊन नवनियुक्त सलून व्यवसाय कार्यकारिणीचे गठन करण्यात आले.

ठराव व निर्णय क्र. 1 :-
1) अध्यक्ष – श्री उमेंद्र सुखदेवजी बनस्कर
2) उपाध्यक्ष – श्री जागेश्वर नारायणजी कावळे
3) कार्याध्यक्ष – श्री गोवर्धन जयरामजी फुलबांधे
4) सचिव – श्री जितेंद्र परासरामजी लांजेवार
5) कोषाध्यक्ष – श्री प्रविण दौलतजी ढोके
6) उपाध्यक्ष- श्री प्रमोद गोपीचंदजी लांजेवार
7) सहसचिव – श्री कृष्णा शंकरजी सुर्यवंशी
ठराव व निर्णय क्र. 2 :-
सदरील सभेत सलून व्यवसाय कार्यकारिणीचे दर सुद्धा ठरवून पारित करण्यात आले.
ठराव व निर्णय क्र. 3 :-
नाभिक युवा मंच/आघाडी एकोडी सर्कल ता. साकोली युवा सदस्य नियुक्ती करण्यात आली :-
1) एकोडी सर्कल अध्यक्ष :-
प्रशांत चंद्रभानजी लांजेवार
2) आशिष शरद सुर्यवंशी
3) जोगेंद्र केवळाराम लांजेवार
4) मंगेश डिगांबर फुलबांधे
5) श्रीकांत मंसारामजी लांजेवार
सदर सभेत एकोडी सर्कल मधील बहुतांश समाज बांधवांची सहकार्य व उपस्थिती होती व नवनियुक्त कार्यकारिणीच्या पदाधिकारींचे स्वागत करून पदभार सोपवून शुभेच्छा देण्यात आल्या. आभारप्रदर्शन नवनियुक्त एकोडी सर्कल येथील युवा कार्यकर्ते श्री प्रशांत लांजेवार यांनी केले व अल्पोपहाराने सभेची सांगता झाली व सभा सफल संपन्न झाली.

प्रसारण व आभार :-
श्री नागेश लांजेवार, सचिव
(म.ना.म. तालुका शाखा साकोली)

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close