स्टडी पॉईंट अभ्यासिकेचे उद्घाटन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यात गोपेगाव व वडी ग्रामपंचायत मार्फत स्टडी पॉईंट अभ्यासिकेचे उद्घाटन गटशिक्षण अधिकारी मुकेश राठोड यांनी केले यावेळी संबंधित सरपंच व वडीचे जि.प.शाळेचे मुख्याध्यापक संजय चिचाणे उपस्थित होते.
सध्या ग्रामीण भागात गावोगावचे प्राथमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थी संध्याकाळच्या वेळी गटागटाने मोठ्या प्रमाणात अभ्यासाला बसत आहेत असे अभ्यास गट गल्लीबोळात , गल्लीतील बैठकीत, एखाद्या ओसरीत तसेच मोठ्या ग्रामपंचायतच्या दिवाबत्तीच्या उजेडाखालीसुद्धा हे मुले बसत आहे .
आपण आपली या मुलासाठी जबाबदारी लक्षात घेऊन प्रत्येक गावात स्टडी पॉईंट नावाची मोठ्या अभ्यासिका असलेली व फर्निचर दिवाबत्ती इन्वर्टर सोलार सोयी युक्त व पाण्याची सोय असलेली एक हॉल अथवा अद्यावत असा स्टडी पॉईंट अभ्यासिका ग्रामपंचायत मार्फत किंवा वित्त आराखडा जीपीडीपी अंतर्गत विकसित करण्याचा मानस असुन त्या बाबतीत सर्व सरपंच ग्रामसेवकांना सांगितले आहे.
पाथरी तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख हा चढता असून हा वारसा जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल .सर्व ग्रामसेवक सरपंच मंडळी यांनी यावर विचार केला तर पुण्यासारख्या ठिकाणी असणाऱ्या स्टडी पॉईंट ची ठिकाणे अभ्यासिकेचे स्वरूपात आपल्या ग्रामीण क्षेत्रात तयार केल्यास याचा थेट लाभ आपल्याच तालुक्यातील विद्यार्थ्यांना नक्कीच होईल मुलांना अभ्यासाची सवय लागेल व परिणामी गुणवत्तेसोबत नवीन शैक्षणिक क्रांतीची सुरुवात होईल असे गटशिक्षण अधिकारी मुकेश राठोड यांनी सांगितले.