ताज्या घडामोडी

पहिली मुलींची शाळा स्त्रियांच्या मुक्तीचं मंदिर, त्या मंदिरातील सावित्री हिच विद्येची खरी देवता-रामचंद्र सालेकर

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

दि.१० मार्च २०२२ ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन जि.प.उ.प्रा.शाळा वाघनख येथे घेवून सावित्रीमाईंच्या कार्याच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी सांगीतले की आंतरराष्ट्रीय महिला दिन हा ८ मार्च जरी असला तरी आपल्या भारतातील राष्ट्रीय महिला दिन खऱ्या, अर्थाने १ जानेवारी १८४८ ज्या दिवशी सावित्रीबाईंनी पहिली मुलींची शाळा सुरु केली तो दिवस स्त्री मुक्ती महिला दिन म्हणून उत्सवाच्या रुपात साजरा व्हावा.सच्चे मानवतावादी कर्म करणाऱ्या महामानवांना आपण त्यांचे मुळ रुप बदलवून देव माणले आहे,त्याप्रमाणे बुद्धीप्रामाण्यवादी विचार केला तर खरी विद्येची देवता ही माता सावित्रीच आहे.जर विद्येची देवता म्हणून पुजन करायच असेल तर सावित्रीमाईचचं पुजन करावं, मुलींची पहिली शाळा स्त्रियांच्या मुक्तीचं मंदिर असून त्या मंदिरातील सावित्रीबाई हिच खरी विद्देची देवता आहे.समाज तथा आधुनिक विज्ञानयुगातील विद्यार्थी जागा होतोय आज शाळाशाळात माॕ सावित्री च्या पुजनानेच कोणत्याही शालेय कार्यक्रमाची सुरुवात होतांना दिसते विद्देची कल्पित देवता जवळजवळ शाळातून हद्दपार झालेली दिसतं आहे ही फार मोठी समाजपरिवर्तनाची नांदी आहे. विद्यार्थ्यांना शोभेल असा वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक विद्यार्थ्यांनी अंगीकारावा असे आवाहन मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांनी केलं.
याप्रसंगी शाळेचे विज्ञान शिक्षक धनराज रेवतकर सर यांनी सावित्रीबाईच कार्य या भारतालाच नवे तर विश्वाला मार्ग दाखविनारे कार्य होते.त्यांच्या प्रेरणेनेच मलाला सारख्या विद्यार्थीनीने व्यवस्थेशी लढा देवून तिच्या देशात क्रांती घडवून आणली असल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संतोष धोटे सर यांनी तर आभार सौ.रेखा थुटे मॕडम यांनी मानले.
कार्यक्रमाचे संचालन वर्ग ६ वी ची विद्यार्थीनी कु.श्रावणी रामटेके हिने केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close